संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 31 – कामठी तालुक्यातील रनाळा येथील सद्भावना भवनात ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ सेविका स्वर्गीय प्रभावती मस्के यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते। ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या संस्थापिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी यांचे हस्ते स्वर्गीय प्रभावती मस्के यांच्या पावनस्मृतीस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून सामुहिक प्रार्थना सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी वंदना दीदी, सीलू दीदी ,उमेश मस्के, कांचन दीदी , घनश्याम चकोले ,हरिहर गायधने सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी यांनी स्वर्गीय प्रभावती मस्के यांच्या जीवन चरित्रावर प्रार्थना सभेत मार्गदर्शन केले प्रार्थनासभेचे संचालन व आभारप्रदर्शन वंदना दीदी यांनी केले.