विधानसभा अध्यक्ष व वि. प. उपसभापतींची ‘सुयोग’ला भेट

नागपूर :- विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, तसेच माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

शिबिरप्रमुख दिलीप जाधव, सहशिबिरप्रमुख राजन पारकर यांच्यासह अनेक पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या दहा दिवसांत अधिकाधिक कामकाज चालविण्याचा आमचा प्रयत्न असेल. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी अधिवेशनातील वेळेचा सदुपयोग करण्यावर आमचा भर आहे, असे नार्वेकर व डॉ. गो-हे यांनी यावेळी सांगितले. 

विधानपरिषदेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त महत्वाच्या विधेयके, ठराव, प्रस्तावांवरील चर्चा, परिषदेची शतकपूर्ती वाटचाल याबाबत ग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहेत, असे डॉ. गो-हे यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद उपसभापतींनी पत्रकारांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. जाधव व पारकर यांनी स्वागत केले. विधीमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल, डॉ. राहूल तिडके, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

३४०५ लाभार्थ्यानी घेतला मनपाच्या 'विकसित भारत संकल्प यात्रा विशेष शिबिरांचा' लाभ

Thu Dec 7 , 2023
नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा दहाही झोन निहाय आयोजित विशेष शिबिरांचा नागपूर शहरातील ३४०५ लाभार्थ्यानी लाभ घेत विकसित भारतासाठी ची शपथ घेतली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com