इच्छुकांचे आता 28 जुलै च्या नवीन आरक्षण सोडतीकडे वेधले लक्ष

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-कामठी नगर परिषद निवडणुकीचे गणित बदलणार!

– ओबीसी आरक्षणामुळे निघणार नव्याने सोडत

कामठी ता प्र 23 :- आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणा विनाच होणार असल्याचे गृहीत धरून तसे आरक्षण सोडतिचा कार्यक्रम आटोपुन झाला असून निवडणुका लागण्याच्या तोंडावर असतानाच आता 20 जुलै ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षण लागू झाल्याने आता कामठी नगर परिषद ची आरक्षण सोडत ही नव्याने 28 जुलै ला होणार असून नव्याने होणाऱ्या आरक्षणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे परिणामी कामठी नगर परिषद च्या निवडणुकीचे गणित आता बदलणार आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या कामाला सुरुवात झाली होती त्यात प्रभाग रचनेचा टप्पा पार पडला, ओबीसी आरक्षणाचा विषय नसल्याने आरक्षण सोडतही जाहीर झाली होती व त्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती सोडून सर्वच जागा खुल्या गटातून लढत देणार होत्या परिणामी आजी-माजीच काय नवनवे चेहरे इच्छुकाच्या गर्दीत दिसून येत होते.
खुल्या गटातुन कुणीही लढू शकणार असल्याने त्यांचे सेटिंगसुद्धा सुरू होते मात्र असे होत असतानाच ओबीसी आरक्षणाचा विषय सुटला व त्यामुळे आता ओबोसी आरक्षण लागू झाल्याने आता नव्याने आरक्षण सोडत निघणार आहे .अशातच आता सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतोकडे लागले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी 'हर घर तिरंगा'मोहिमेत सहभाग नोंदवावा-बीडीओ अंशुजा गराटे

Sat Jul 23 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 23 – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्वरभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मूर्ती तेवत राहाव्यात .या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञान, क्रांतिकारांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13ऑगस्ट 2022 ते 15 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com