वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रससाठी अश्विनी कुमार सिंघल खर्च निरिक्षक

यवतमाळ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जिल्ह्यात चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी आयोगाच्यावतीने सहा निरिक्षक दाखल झाले. वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रससाठी अश्विनी कुमार सिंघल खर्च निरिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

सिंघल हे भारतीय महसूल सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहे. वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस या चार विधानसभा मतदारसंघातील सर्व खर्च विषयक बाबी ते पाहणार आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ७४९९०३९०८९ असा आहे. या चार मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी त्यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊ शकतील. निवडणूक खर्च विषयक तक्रार, निवेदन असल्यास निरिक्षकांशी संपर्क साधता येईल, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

७९९ रुग्णांनी घेतला मनपाच्या फिजिओथेरपी केंद्राचा लाभ

Sun Nov 3 , 2024
– दिव्यांग अन् ज्येष्ठांसाठी फिजिओथेरपी केंद्रात नि:शुल्क सेवा नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ फिजिओथेरपी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवा माफक दारात उपलब्ध करण्यात आल्या असून, ६ ऑक्टोबर पासून आजवर ७९९ रुग्णांनी मनपाच्या फिजिओथेरपी केंद्राचा लाभ घेतला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!