घराच्या आत आग लागुन जिवनापयोगी सामुग्रीची राखरांगोळी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- कांद्री वार्ड क्र. ३ ढिवर मोहल्ला शिवनगर येथे घर मालक बाळकृष्ण मनघटे यांचा मागील भागाच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील कपडे सह जिवनापयोगी सामुग्री जळुन राख रांगोळी होऊन अंदाजे चाळीस हजार रुययांचे नुकसान झाल्याचे भाडे करु अनिल शुक्ला यांनी सांगितले.

प्राप्त माहिती नुसार अनिल जगदीश शुक्ला वय ५० वर्ष हे मागील ४ वर्षा पासुन बाळकृष्ण बीरचंद मनघटे वय ७५ वर्ष रा. वार्ड क्र.३ ढीवर मोहल्ला शिवनगर कांद्री यांचे घरी भाड्याने राहत आहे. सोमवार (दि.४) सप्टेंबर ला सकाळी ९ वाजता अनिल शुक्ला हे घरुन पुजा पाठ करुन दाराला कुलुप लावुन कामावर गेले होते. सकाळी ११.३० वाजता दरम्यान घराच्या आत आग लागल्याने घरातुन धुवा निघत असल्याचे नागरिकांना लक्षात येताच त्यांनी घराकडे धाव घेत घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन प्रथम सिलेंडर ला बाहेर काढले व वेकोलि खदान येथील अग्निशमन बंब बोलावुन पाण्याचा फवारा मारुन आगीवर नियंत्रण मिळवले.

ही आग घरातील देव्हा-यातील दिव्याला उंदिरा च्या धक्काने दिवा पडुन घराच्या आत आग लागली असुन आगित घरातील कपडे व जिवनापयोगी सामग्री जळुन राख रांगोळी झाल्याने अंदाजे चाळी हजार रुययांचे नुकसान झाल्याचे भाडेकरू अनिल शुक्ला यांनी सांगितले. सदर घटनेची माहिती कांद्री नगरपचायत, तलाठी महेंद्र क्षीरसागर व कोतवा ल चंदु निखार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोह चुन पंचनामा करून अहवाल तहसिलदार पारशिवनी याना पाठविणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

14 कृषी सहाय्यकावर 77 गावाचा भार

Mon Sep 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कृषी विभागाला रिक्त पदांचे ग्रहण ,कामाचा उडताहेत बोजवारा – मागील दोन महिन्यापासून तालुका कृषी अधिकारी पद प्रभारी स्वरूपातच कामठी :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कामठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण अजूनही कायम असून कामठी तालुक्यातील एकूण 77 गावाचा भार केवळ 14 कृषी सहाय्यक सांभाळत आहेत त्यातच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!