अशोकचक्रवीर शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकास अल्पसंख्याक विकास मंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री यांच्याकडून अभिवादन  

मुंबईदि.26 : मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद अशोकचक्रवीर तुकाराम ओंबळे यांच्या गिरगाव येथील स्मारकास अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरेखासदार सुप्रिया सुळे यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.

            इतिहासातील शूरवीरांच्या गाथा पराक्रम आपण आजवर वाचला आहे. परंतु 26/11 च्या हल्ल्यात निधड्या छातीने दहशतवाद्यांवर चालून गेलेल्या अशोकचक्रवीर शहिद तुकाराम ओंबळे यांचा पराक्रम  मुंबईसह सबंध जगाने पहिला आहे. त्यात शहीद तुकाराम ओंबळे यांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्याची किमया केली. अशा या निर्भीड व्यक्तिमत्वाला यावेळी अभिवादन करण्यात आले.

             26/11 हा दिवस या देशासाठी काळा दिवस असला तरी समस्त मुंबईकरांना व महाराष्ट्राला निर्धास्तपणे जगण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शाहिद तुकाराम ओंबळेवरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरेविजय साळसकरअशोक कामटेमेजर संदीप उनीकृष्णन यांच्यासारख्या शूर अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती अभिमानआदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्व आहे अशा भावना  राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सावनेर में पतंजली योग समिती द्वारा भव्य योग शिबिर

Fri Nov 26 , 2021
सावनेर– सावनेर में पतंजली योग समिती द्वारा भव्य योग शिविर 24 नोवेम्बर 2021 से 28 नोवेम्बर 2021 तक दुर्गा माता मंदिर गड़करी चौक,सावनेर में किया गया है।  शिविर में आज तीसरे दिन पतंजलि नागपुर जिला संगठन मंत्री श्री संजय खोंड जी ने योग सत्र का संचालन किया । अपनी विशिष्ट मंत्रमुग्ध कर देंने वाली शैली में उन्होंने विभिन्न व्याधियों में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com