नागपुर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) नागपूर जिल्हा कमिटी तर्फे गुरुदेव सेवाश्रम सभागृहात आशा व गटप्रवर्तक यांचे मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी शिबिराला संबोधित करतांना जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र साठेनी सांगितले की, आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्यावर कोरोना पासून कामाचा जास्त ताण येत आहे. वरिष्ठ अधिकारी वर्ग धमक्या देऊन आशा वर्कर कळून बळजबरीने काम करून घेण्याच्या प्रयत्न करीत आहेत. परंतु मोबदला देताना विधवा -घटस्फोटीत असणाऱ्या आशांना तीन-चार महिन्यापेक्षा अधिक काळापर्यंत मानधना करता ताटकळत राहावे लागते. त्याची कोणत्याही पद्धतीची दखल घेतल्या जात नाही.
केंद्र सरकार 2018 पासून फक्त 1500 रुपये महिना मानधन देत आहे. केंद्र सरकार तर्फे आजपर्यंत कोणतीही वाढ देण्यात आलेली नसून राज्याच्या निधीतून सुद्धा मानधन फार विलंबाने मिळत आहे. क्षयरोग, कुष्ठरोग, हत्तीरोग शोध मोहीम सारखे सर्वे करून एक वर्षापेक्षा अधिक काळ मोबदल्या पासून वंचित रहावे लागते.
आरोग्यवर्धिनीचा निधी एक वर्षापासून अधिक काळ होऊन सुद्धा त्यांच्या पदरात पडलेला नाही. जे एस वाय अंतर्गत एपीएल / बीपीएल अट रद्द करून सरसकट मोबदला देण्यात यावा कामाच्या ठिकाणी होणारी प्रताडना थांबवण्यात यावी, ग्रॅज्युटी पाच लाख रुपये, तसेच आशा वर्कर यांना दहा हजार व गटप्रवर्तकांना पंधरा हजार रुपये रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आलेली आहे. नवीन शहरी आशांना बिना प्रशिक्षण काम करण्यास बाद्ध करण्यात येतो. परंतु मोबदला देताना प्रशिक्षण न झाल्यामुळे मोबदला देता येत नाही अशी कारणे सांगून कित्येक महिने मोफत मध्ये काम करून घेण्यात येते. मातृ वंदन योजनेचे लाभार्थ्यांना पाच हजार रुपये देण्यात येतात व आशांना तीन टप्प्यात काम करून सुद्धा फक्त दोनशे रुपये देण्यात येतात ते पाचशे रुपये प्रति लाभार्थी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागू न केल्यास मुंबई पर्यंत पैदल लॉन्गमार्च काढण्याचा इशारा सीटू संघटने मार्फत देण्यात आलेला आहे.
राज्य आशा प्रशिक्षक मनोज पवार यांनी मार्गदर्शन करतांना सीटू सोबत आशांनी संघटित राहून थकत्यावया नंतर परिवार चालवण्याकरिता पेन्शनची रक्कम व्याजाच्या रूपाने आशांच्या पदरी पडावी याकरिता संघटनेने प्रत्येक आशा वर्करच्या नावे किमान 50 हजार रुपये फिक्स डिपॉझिट करावे अशी मागणी मांडण्याची सूचना त्यांनी दिली. जिल्हा महासचिव कॉ. प्रीती मेश्राम यांनी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी कोणते काम कोणत्या पद्धतीने करायचे त्याचा रेकॉर्ड कसा मेंटेन करायचा व कोणत्या कामावर किती मोबदला यावर त्यांनी मार्गदर्शन केले. आपले अधिकार मिळवून घेण्याकरता आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी जास्तीत जास्त संख्येने सिटू संघटने सोबत संघटित राहून संप करावा अशी त्यांनी घोषणा केली. संयुक्त महिला समितीचे अध्यक्ष कॉ. आशु सक्सेना यांनी महिलांवर होणारे अत्याचार व महिलांच्या गरजा कशा पूर्ण होतील व होणाऱ्या अत्याचाराशी सामना कसा करायचा त्यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कॉ. प्रमोद कावळे यांनी विविध रोगाने ग्रस्त असणाऱ्या आशा वर्करच्या परिवाराला तसेच शैक्षणिक व आर्थिक रूपाने गरजू असणाऱ्यांना संघटनेमार्फत निधी उपलब्ध करून देण्याकरता विशेष योजना राबविण्यात यावी अशा सूचना मांडल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, प्रमोद कावळे, रुपलता बोंबले, माया कावळे, आरती चांभारे, लक्ष्मी कोत्तेजवार, अंजू चोपडे, उज्वला कांबळे, कल्पना हटवार, अर्चना कोल्हे, करुणा पौनीकर, कल्पना राऊत, वंदना बहादुरे, अरुणा शेंडे, सरिता ठवरे, पुष्पा गाऊत्रे, अर्चना ठाकरे, आशा वानखेडे, नीता भंडारकर सह 800 पेक्षा अधिक आशा वर्कर उपस्थित होत्या.