रेल्वे मधून उतरताच मेट्रो होणार उपलब्ध

नागपूर रेल्वे मेट्रो स्टेशन व नागपूर रेल्वे स्टेशन राहणार संलग्न

 खापरी,अजनी रेल्वे स्टेशन नंतर आता नागपूर रेल्वे स्टेशन देखील संलग्न झाले मेट्रो सोबत

नागपूर  : नुकतेच रिच २ ( सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते वैष्णो देवी चौक मेट्रो स्टेशन) दरम्यान महा मेट्रोने यशस्वीरीत्या प्रथम टेस्ट रन पूर्ण केली असून या मार्गिकेवर लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याच्या उद्देशाने इतर अनेक निर्माण कार्य गतीने पूर्ण केल्या जात आहे जेणेकरून नागरिकांना मेट्रो सेवा उल्बध व्हावी. या अनुषंगाने महा मेट्रोने, शहराच्या मध्यभागी स्थित असलेले नागपूर रेल्वे स्टेशन मेट्रो सेवे सोबत संलग्न केले असून रेल्वे मधून उतरताच मेट्रो ट्रेनने प्रवास करता येईल.

ऍक्वा लाईन मार्गिकेवरील नागपूर रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य देखील पुर्णत्वाकडे अग्रेसर आहे. असून सदर मेट्रो स्टेशन प्रवासी वाहतुकीकरीता सुरु झाल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा फायदा होणार. मुख्य म्हणजे भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना नागपूर रेल्वे स्टेशन येथे उतरताच मेट्रो ट्रेनने प्रवास करता येईल.

महा मेट्रोने नागपूर रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म क्रमांक ८ येथून म्हणजेच संत्रा मार्केटच्या बाजूने मेट्रो स्टेशनला जोडले आहे.ज्यामुळे नागरिकांना सहज पणे मेट्रो स्टेशन परिसरात पोहचता येईल तसेच मेट्रोचा उपयोग करून पुढील यात्रा करणे शक्य होईल. मुख्य म्हणजे नागपूर रेल्वे स्टेशन येथून देशाच्या चारही बाजूने जाणाऱ्या रेल्वे गाड्या या मेट्रो स्थानकावरून जात असतात ज्याला डायमंड क्रॉसिंग म्हणून देखील ओळखल्या जाते. मोठ्या प्रमाणात नागरिक देशाच्या अन्य ठिकाणी जाण्याकरता या ठिकाणाहून प्रवास करीत असतात त्यामुळे रेल्वे प्रवाश्याना निश्चितच याचा फायदा होईल. या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशन जवळ असलेले संत्रा मार्केट,मॉल,शाळा,रेल्वे रनिंग रूम,रेल्वे कॉलोनी तसेच अनेक जुन्या वस्तीतिल नागरिकांनकरिता देखील उपयुक्त ठरेल. स्टेशन लगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शासकीय व निमशासकीय कार्यालय, मंदिर, हॉल असल्यामुळे या परिसरात नागरिकांची नेहमीच रहदारी असते सदर मेट्रो स्टेशन सुरु झाल्यावर प्रवाश्याना तसेच स्थानिक नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे .

या पूर्वी देखील महा मेट्रोने ऑरेंज लाईन मार्गिकेवरील अजनी रेल्वे स्टेशन काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनशी संलग्न करण्यात आले आहे त्या ठिकाणी देखील महा मेट्रोने अजनी रेल्वे स्टेशनच्या पहिल्या फ्लॅटफॉर्म येथून मेट्रो स्टेशनला जोडले आहे. ज्यामुळे अनेक नागरिकांना सहज पणे मेट्रो स्टेशन परिसरात पोहचन्यास मदत मिळत असून नागरिक मोठ्या प्रमाणात याचा फायदा होत आहे.

नागपूर रेल्वे स्टेशन येथून मेट्रो प्लॅटफार्म पर्यंत पोहोचण्याकरीता एस्केलेटर्सचा उपयोग: नागपूर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफार्म पर्यंत पोहोचन्याकरिता महा मेट्रोने नागपूर रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म क्र. ८ येथून एस्केलेटर्सची व्यवस्था केली आहे. मेट्रोस्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

मेट्रो स्टेशनची वैशिष्ट्ये: आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंट मध्ये अग्निशामक टॅंक, दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा,अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था,कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी घोषणा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पावसाचे पाणी साठवून ठेवण्याकरता तरतूद, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, लहान मुलांच्या देखरेखीकरता स्वतंत्र खोली (बेबी केयर रूम), कॉन्कोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा,संपूर्ण स्टेशन सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत असणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोल मिनिस्टर के दोहरे बोल - कोयला आयात को करेंगे खत्म, मांग ज्यादा आयात के अलावा विकल्प नहीं

Thu Dec 23 , 2021
नई दिल्ली- देश में मांग के अनुरूप कोयले की औसतन 219.616 मिलियन टन की कमी बनी हुई है। लिहाजा इतना ही कोयला विदेशों से आयात करना पड़ रहा है।हालांकि Ministry of Coal ने अनावश्यक आयात में कमी लाने के लिए 2023-24 तक एक बिलियन टन कोयला उत्पादन के रोड मैप तैयार किया है। इसके तहत शत प्रतिशत प्रत्यक्ष विदेशी निवेश एवं वाणिज्यिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com