लग्नाचे नाव काढताच तो पळाला

– रेल्वे पुलाखाली तरुणीवर अत्याचार

– रूग्णालयात गेल्यावर उलगढले रहस्य

– वरूड येथून आरोपीला अटक

– लोहमार्ग नागपूर ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर :- लग्नाचे आमिष दाखवून एका कामगार तरुणीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना अजनी रेल्वेस्थानक परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला आहे. पंडित (२२) रा. बिहार असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गर्भवती असलेल्या पीडितेने त्याला लग्नासाठी विनवनी केली असता तो पळाला. मात्र, पोलिसांनी त्याला अमरावतीच्या वरूड येथून अटक केली.

मागील वर्षभरापासून रेल्वेचे विकास कामे सुरू आहे. कंत्राटदाराकडून काही कामगार गेल्या आठ महिण्यापासून अजनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म नंबर सात जवळ अस्थाई झोपडी राहात आहेत. यातील पीडिता ही आई वडिलांसह राहाते. तर आरोपी धीरजकुमार हा सुध्दा कामगार असून जवळपास राहात होता. ते प्लॅटफार्म नंबर सातवर काम करीत होते. कामानिमीत्त दररोज बोलचाल व्हायची. यातूनच दोघांचीही मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या जवळ आले.

आरोपी धीरजकुमारने तिला प्रेम जाळ्यात ओढले. त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आता करायचे असल्याने धीरजकुमार संधी मिळताच अजनीच्या रेल्वे पुलाखाली तिच्यावर अत्याचार करायचा. नंतर ईतवारी रेल्वे स्थानकावर विकास काम सुरू झाल्याने कामगारांना तेथे पाठविण्यात आले. त्याठिकाणी सुध्दा धीरजकुमार पीडितेवर अत्याचार करायचा. दरम्यान तिच्या शरीरात कमालिचा बदल झाला होता तसेच तिच्या वागण्यातील बदल पाहून आई वडिल तिला रूग्णालयात घेवून गेले. ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या आई वडिलांनी विचारपूस केली असता धीरजकुमारचे नाव पुढे आले. त्यांनी आरोपीला बोलाविले. लग्न करण्यासाठी विनवनी केली. मात्र, लग्नाचे नाव ऐकताच तो पळाला. पीडितेच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला. पोलिस पथकाने त्याचे लोकेशन घेतले असता तो वरूडला असल्याचे समजले. पोलिसांनी वरूडहून त्याच्या मुसक्या छट पूजेसाठी गावी जात होतो. परतल्यावर लग्न करणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला न्यायालयात उपस्थित केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक गावंडे यांच्या नेतृत्वात मजहर अली, पप्पू मिश्रा यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिवाळीच्या दिवशीच फटाके फोडण्यावरुन गुंडाचा खून

Mon Nov 4 , 2024
नागपूर :- फटाके फोडण्यावरुन दिवाळीच्या दिवशी एका कुख्यात गुंडाचा युवकाने चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता इमामवाड्यात घडली. अमोल ताराचंद वाघमारे (२५, रा. दोन मूर्तीचौक, रामबाग) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शशांक वसंतराव डोंगरे (१८, रा. रामबाग) असे आरोपी युवकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमोल वाघमारे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!