– डिजिटल युगात पोलीस स्टेशन हायटेक झाले असताना ,फिर्यादीच्या स्वाक्षरीसाठी अडली आरोपींवरील कारवाई
कोदामेंढी :- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार किशोर साहू यांच्या घरावर येथील घोटाळेबाबत सरपंच आशिष बावणकुळे व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी हल्ला केला. लपल्याने ते सुदैवाने बचावले . ही घटना मंगळवार 22 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी तीन तीस वाजता घडली. ग्रामपंचायत मध्ये सामान्य निधीतून सरपंचांनी पथदीप खरेदी करण्याच्या नावावर 3 ,88 ,474 रुपये खरेदी न करता बोगस बिल काढून घोटाळा केल्याचे मागील दहा दिवसांपूर्वीपासून विविध मराठी व हिंदी दैनिकांमधुन साहू यांनी वृत्तमालिका प्रकाशित करून उघडकीस आणला. या भ्रष्टाचाराची आनलाईन तक्रार मंत्रालयात , खंडविकास अधिकारी , पोलीस अधीक्षक ग्रामीण नागपूर , उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक, अरोली पोलीस स्टेशन यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत मंत्रालयाकडून त्यांची चौकशी सुरू आहे .त्यातच काल 22 ऑक्टोबर मंगळवारला अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत व कॉन्स्टेबल राजेंद्र पुडके यांनी दुपारी दीड वाजता चौकशी करून सरपंच, सचिव , दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यासाठी साहू यांनी दिलेल्या ऑनलाईन तक्रारीचे बयान साहू यांच्या घरी घेऊन दुपारी दीडच्या दरम्यान नोंदविले .याची चाहूल सरपंचाला लागतात त्याने त्याचे समर्थक शुभम वैरागडे , माजी उपसरपंच सुनील डोंगरे व त्यांची पत्नी माधुरी डोंगरे यांनी दोन दुचाकीच्या आत अस्त्र ,शस्त्र आणून ,चौघांनी दुपारी साडेतीनच्या दरम्यान साहू यांच्यावर हल्ला केला. अश्लील शिवीगाळ करत , गेट उघडून घरात शिरले व साहू यांना जीवानीशी ठार मारण्याची धमकी दिली.हल्लेखोरांच्या रौद्ररूप पाहून साहु यांनी त्यांचे घराचे दार आतून बंद केले.तुला आज जीवनीशी ठार मारायचे आहे , तू दार उघड असे ते जोर जोराने दार ठोठावत पाच ते दहा मिनिट म्हणत राहिले .घटनेची माहिती साहु यांनी भ्रमणध्वनी वरून अरोली ठाणेदार स्नेहल राऊत यांना दिली .मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने,त्यांनी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी रामटेक यांना दिली.पोलीस येणार असल्याची चाहूल लागताच,हल्लेखोर त्यांनी आणलेल्या दोन दुचाकीने तू घरा बाहेर निघतात तुला जीवनीशी ठार मारण्याची धमकी व घाणेरड्या अश्लिल शिविगाळ देत पसार झाले .या घटनेमुळे आपल्यासह परिवाराला धोका निर्माण झाल्याची व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी स्वतःची स्वाक्षरी करून लेखी ऑनलाइन तक्रारअरोली पोलीस स्टेशनला दिली .तक्रारीच्या प्रतीलीपी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण ,उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक ,यांनाही ऑनलाईन सायंकाळी सहा दरम्यान पाठविल्या .रात्री 11: 52 दरम्यान अरोलीचे ठाणेदार राऊत यांनी इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे माहिती पाठवली कि, प्रचलित कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे तक्रार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने तीन दिवसाच्या आत स्वाक्षरी केल्यानंतर त्याची नोंद घेतल्या जाते .पोलीस स्टेशन मध्ये प्रत्यक्ष जाऊन हजर राहून ही स्वाक्षरी करायची असल्याने 13/03/2023 ला साहूं सोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असल्याने, साहू हे आजही रात्री साडेआठच्या दरम्यान बातमी लिहेपर्यंत स्वाक्षरी करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले नसल्याने आरोपींवर अजूनही कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नसून आरोपी मोकाट फिरत आहेत .
13 /03/2023या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की,या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात साहू यांना ग्रामरोजगार सेवक पदावरून निष्कासित करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते .ग्रामसभेत साहू हे त्यांच्यावर लावलेल्या आरोप कसे खोटे आहेत याचे स्पष्टीकरण देत असताना मधेच,सरपंच आशिष बावणकुळे हे बेकायदेशीरपण मधातच उभे राहून ग्रामसभेत गदारोळ करून साहू यांच्यावर ग्रामसभेत आणलेल्या दंडा घेऊन साहू यांच्यावर ते स्वतः व त्यांचे समर्थक रामदास बावनकुळे, गोलू ( महेन्द्र) बावनकुळे,शुभम वैरागडे,सुनील डोंगरे,माधुरी डोंगरे व त्यांचे इतर आठ समर्थक यांनी हल्ला केला .याची तक्रार करण्यासाठी ते प्रत्यक्ष अरोली पोलीस स्टेशनला गेले असता,त्यांच्या तक्रारीवर अरोली पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार राजेश जोशी यांनी एन.सी. ची पावती देत कोर्टात जाण्याचा सल्ला दिला .मात्र प्रत्यक्ष आरोपी असलेले सुनील डोंगरे यांच्या साहू यांनी ग्रामसभेत डोंगरे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या खोट्या तक्रारीवरून व प्रत्यक्ष आरोपी असलेले वरील व इतर आठ समर्थक त्यांनी दिलेल्या खोट्या साक्ष वरून,घटनेच्या प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवल्यानंतरही सखोल तपास न करता तत्कालीन ठाणेदार राजेश जोशी व तत्कालीन रामटेकची प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्तार बागवान यांनी साहू यांच्यावर ॲट्रॉसिटीॲक्ट लावून पंधरा दिवस तुरुंगात ठेवले .एवढेच नव्हे तर आठ एप्रिल 2023 रोजी साहू हे नागपूरला पाचपावली येथे त्यांच्या ताईकडे 7 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान मुक्कामी असताना , त्यांच्याकडे नागपूरला असण्याचे ठोस पुरावे सुद्धा असताना,साहू यांनी आठ एप्रिल रोजी त्यांच्या सावंगी रोडावरील स्थित साहू ट्युशन क्लासेसच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारती समोरील परिसरात सरपंच आशिष बावनकुळे यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी एकट्यात दिल्याचे पुन्हा खोटे तक्रार अरोली पोलीस स्टेशनला व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय रामटेक येथे सरपंच आशिष बावणकुळे यांच्याकडून करण्यात आल्याने साहू यांच्यावर पुन्हा तत्कालीन ठाणेदार राजेश जोशी यांनी धृतराष्ट्र बनून 107 व 116 ची कलम बेकायदेशीर पणे लावली कारण एकट्यात शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याने कलम 107 व कलम 116 लागत नसल्याचे वकिलांचे कायदेशीर म्हणणे आहे. तर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक आतिश कांबळे यांनी धृतराष्ट्र बनून 110 ची कलम लावली .सरपंच आशिष बावणकुळे हे रेत माफीया असल्याने त्यांचे अरोली पोलीस स्टेशनचे व रामटेक उपविभागीय अधिकारी कार्यालमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने ते फिर्यादीला आरोपी बनवतात व आरोपीला फिर्यादी बनवत असतात .लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांवर घरी जाऊन हल्ला करूनही दोन दिवसाच्या कालावधी होऊनही , मोकाट फिरतात .महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय खलनिग्रणाय असे असून अरोली पोलीस स्टेशनचे व उपविभागीय अधिकारी रामटेक कार्यालय यांचे ब्रीद वाक्य हे खलरक्षणाय सदनिग्रणाय असल्याने ,साहू यांच्यावरील ॲट्रॉसिटी ॲक्ट न्यायालयात प्रलंबित असल्याने साहू शासनाने पुरविलेल्या डिजिटल माध्यमांचा उपयोग करून कायदेशीरऑनलाइन तक्रार करत असतात . पोलीस स्टेशन व इतर सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळतात .