राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गडचिरोलीवरून आगमन

– कोराडी येथील सांस्कृतिक भवन लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार

नागपूर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे दुपारी १ वाजता गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत कार्यक्रमावरून नागपूरला परतल्या. दुपारच्या विश्रांतीनंतर राष्ट्रपती कोराडी येथील सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण करणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद उपस्थित होते.   

दुपारी ५ वाजता भारतीय विद्या भवनतर्फे निर्माण करण्यात आलेल्या रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची  - राष्ट्रपती मुर्मू

Wed Jul 5 , 2023
– गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण गडचिरोली :- देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!