नागपूर :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दुपारी आगमन झाले. ते तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले आहेत.
विमानतळावर अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे, सहायक पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते.राजभवनातही त्यांचे स्वागत कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार यांनी केले.
मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता राजभवन येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे सायंकाळी ६ वाजता ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन व टिचिंग एक्सपर्ट पुरस्काराचे वितरण होईल.
बुधवार १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता राजभवन येथून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे प्रयाण करतील.सकाळी १०.३० वाजता तेथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर सकाळी ११.४० वाजता राजभवन येथे आगमन होईल. गुरुवार दि. १४ डिसेंबरला सकाळी ८.२५ च्या विमानाने मुंबईला रवाना होतील.