प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन व स्वागत

छत्रपती संभाजीनगर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी ११.१५ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ.भागवत कराड, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संजय शिरसाठ,आमदार प्रशांत बंब,आमदार उदयसिंह राजपूत, आमदार पंकजा मुंडे, तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पोलीस आयुक्त प्रविण पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड यांची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने जळगावकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'लखपती दीदी' मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात दाखल

Sun Aug 25 , 2024
जळगाव :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘लखपती दीदी’ मेळाव्यासाठी आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळ स्वागतानंतर त्यांनी तेथे उपस्थित लखपती दीदींशी संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दीदी संमेलन स्थळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com