नागपूर :- पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी मुलगी तिचे ट्युशन क्लासवरून सायकलने घरी जात असता, पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत आरोपी एक अनोळखी ईसम याने फिर्यादी मुलीस थांबवुन तिचे सोबत अश्लिल वर्तन केले. फिर्यादी मुलीने आरडा-ओरडा केल्याने नमुद आरोपी तेथुन पळुन गेला. फिर्यादीने पोलीस ठाणे सिताबर्डी येथे तकार दिल्याने सिताबर्डी पोलीसांनी तात्काळ दखल घेवून तांत्रीक तपास केला व गुन्हयातील आरोपी नामे सुफीयान सिराज शेख वय १९ वर्ष रा. प्लॉट नं. ६०, ठाकुर प्लॉट, मोठा ताजबाग, सक्कादरा, नागपूर यास निष्पन्न केले, आरोपीस ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे पोउपनि, भालेराव यांनी आरोपीविरूध्द कलम ३५४, ३५४(ड), ३४५ भा.द.वि., सहकलम १२ पोक्सो कायदयान्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त परि क. २. सहा. पोलीस आयुक्त सिताबर्डी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि, चोरमले, सपोनि, बेडवाल, कदम, मपोउपनि, कटरे, पोहवा, गौतम, कनोजिया, भोकरे, पोअं. मुंडे, भोयर, राठोड व शेंडे योनी केली.