नागपूर :-दिनांक ०१.११.२०२३ चे २२.१५ वा. सुमारास गुन्हेशाखा युनिट चे अधिकारी व अंमलदार यांना, मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून, त्यांनी पोलीस ठाणे मानकापूर हहीत, अय्यपा नगर, श्याम लॉन जवळ, मारोती झुजूकी एरटिगा वाहन के. एम. एन २६ ए के १५९९ या गाडीचा पाठलाग करून गाडीला थांबवुन वाहनाची झडडी घेतली असता वाहनातील आरोपी क. १) असद खान वरद मजीद खान वय ३५ वर्ष रा. श्याम लॉन जवळ, नागपूर २) शोहेब स्माईल शेख वय ३५ वर्ष रा. कुदरत पलाझा अपार्टमेंट, जाफर नगर यांचे ताब्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला सुंगधीत तंबाखु, व तांबाखु जन्य पदार्थ व वेगवेगळा फ्लेवरचे तंबाखु इत्यादी साहित्य मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून नमुद मुद्देमाल व एरटिगा गाडी असा एकूण ६,२२,०४५/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला..
आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे मानकापूर येथे कलम १८८, २७२ २७३३२८ भादंवी सहकलम ५९ अन्न व सुरक्षा मानके अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला मुदेमालासह मानकापूर पोलीसांचे ताब्यात दिले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा,पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पोनि मुकुंद ठाकरे, पोउपनि देवकाते, सफी खोरडे, पांडे पोहवा मुकेश राऊत, प्रविण लांडे, नापोअ अनुप तायवाडे, अमोल जासुद, अनिल बोटरे व मनिष रामटेके, प्रमोद देशभ्रतार यांनी केली.