– नागपूर ग्रामीण विशेष पथकाची कामगिरी
नागपूर :- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी नागपूर जिल्हयात अवैध धद्यांवर कारवाई करून अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथक हे अवैध धद्यांवर कारवाई करीत असतांना दिनांक १४/०१/२०२४ चे ४.५० वा. चे सुमारास गोपनीय सुत्रधारकांकडुन माहीती मिळाली की, सौसर (मध्यप्रदेश) कडुन केळवद मार्ग नागपुरकडे अवैधरित्या विनापरवाना सुगंधीत गुटखा तसेच पान मसाला वेगवेगळ्या कारमध्ये लोड करून महाराष्ट्रात प्रतीबंध असतांना, स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता जाणीवपूर्वक मध्यप्रदेश येथुन प्रतिबंधीत महाराष्ट्रात वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर खबरेप्रमाणे मौजा जयतगढ़ चेक पोस्ट जवळ थंबवुन नाकाबंदी करीत अवैध गुटखा वाहतुक सबंधाने वाहने चेक करीत असता, एका पाठोपाठ दोन कार दिसून आलो, सदर वाहनांना हाताचा ईशारा देवून थांबविले असता १) स्विफ्ट कार क्र. एम. एच.- ४३/बी.ए.- १२३६ चा चालक आरोपी नामे सुरन उर्फ सुच्चा रानु मोखाडे, वय २९ वर्ष, प्लॉट नं. ७२ सांधकर ले आउट भवानी सभागृहजवळ मानेवाड़ा बेसा रोड नागपुर २) इनोव्हा कार क्र. एम. एच ३१ सि.आर. ४२४१ चा चालक रवि शिवकुमार शाहू, वय २९ वर्ष, रा. प्रतापगढ़ राणीगंज दुर्गागंज बाजार उत्तरप्रदेश, ह. मु. प्लॉट नं. ५३ आनंद विहार नगर, भवानी सभागृह जवळ मानेवाडा बेसा रोड नागपुर ३) राकेश अशोक आत्राम, वय ३४ वर्ष, वसंत नगर जुना बाबुलखेडा रामेश्वरी, नागपुर (इनोव्हा कार क्र. एम. एच ३१ सि. आर. ४२४९ चा क्लिनर) यांनी संगणमत करून, स्वत चे आर्थीक फायद्याकरीता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेले सुगंधीत तंबाखु, गुटखा तसेच पान मसाला हे लोचीखेडा (मध्यप्रदेश) कडून सावनेर मार्ग नागपुरकडे अवैधरित्या विनापरवाना वेगवेगळ्या कारमध्ये लोड करून वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने आरोपीतांच्या ताब्यातून १) स्वीफ्ट कार क्र. एम. एच ४३/विए १२३६ २) रिमझीम सुंगधीत तंबाखु ५ पोते १३३५००/- रू ३) लहान राजश्री पाण मसाला १३ पोते किमह ८७७५०/- ४) मोठी राजश्री पाण मसाला १ पोते किंमती ८५००/- रू ५) जनम सुगंधीत तंबाखु ८ पोते ४४,०००/-रु. ६) ब्रॉक लेबल ३ पोते किंमती ७३१२/- रु ७) गोल्डण युग संगधीत तबाखु १ पोते ३०९०/- रू ८) विमल पाण मसाला १०८१०/- रु ९) रत्नाछाप सुगधीत १० पॅकेट किमती ११८००/- रु १०) रजणंगंधा १३ पॅकेट किमती १४५६० रू ११) सुरज राजु मोखाडे मोबाईल किंमती १२,०००/- रू असा एकुण ५३२९२२/- रु आरोपी क्र २) रवी शिवकुमार शाहु वय २९ वर्ष रा. मानेवाडा नागपूर इनोव्हा कार क्र. एम एच ३१/ सि आर ४२४१ किमती ५,००,०००/- २) रिमझीम सुगधीत तवाखु ५ पोते किमती ३००५० रू ३) जणम सुगधीत तवाखु १२ पोते ६६,००० रु ४) बाबा ब्लॅक सुगधीत तंबाखु ६ डब्बे ९५१० रू ५) गोल्डण सफारी ४ पोते २४२०० रु ६) बाबबान सुगधीत तवास्तु १६ दृब्ये किंमती ३४८०० रु ७) सुगधीत तबाखु ६ पोते किमती ४८००० रु ८) गोल्डण युग संगचीत तवास्तु ७ पोते किमती ३००३० रू ५) लहाल इगल सुगचीत तंबाखु १२ पोते किमती ८४,४८० रू १०) एसजीआर २००० सुगधीत तंबाखु ४ पोते किमती ७४४०० ११) लहान राजश्री पाण मसाले ११ पोते किमती ०४२५० रू. १२) मोठी राजश्री राणमसाले ६ पोते किमती ५१००० रु १३) डबल ब्लॉक १८ चे २५ किट किमती ३७५० रु १४) मोठी इगल सुगधीत तंबाखु २ पोते किमती २७२८० १५) ब्लॅक लेवल १८ चे ३ पोते ६१८७ ख तसेच आरोपी कथा मोबाईल फोन किंमती १०,००० आरोपी क्र ३ राकेश अशोक आश्राम वय ३४ वर्ष रा रामेश्वरी नागपूर याचा मोबाईल फोन किंमती १०,०००/- रू असा मुदद्देमाल १०/८३,९३७/- रू. एकूण मुद्देमाल किंमती १६,१६,८५९/- के मुद्देमाल जप्त केला असून सदर आरोपी क्र. १) ते ३) तसेच आरोपी क्र. ४) प्रफुल देशमुख, रा. वर्धा रोड पेट्रोलपंपाजवळ सि/ओ उमेश वाघाडे यांचे घरी किरायाने (इनोव्हा कार क्र. एम. एच ३१ सि. आर. ४२४९ चा मालक) ५) प्रतीक जाधव वय २९ वर्ष, रा. नागपुर (लोधीखेडा मध्यप्रदेश येथुन खरेदी करून नागपूर येथे आणुन विक्री करणारा) ६) आकाश मानापुरे, रा. लोधीखेडा, छिंदवाडा मध्यप्रदेश (पान मटेरीयल दुकान मालक) यांचेविरूद्ध कलम १८८, २७२, २७३, ३२८ भादंवी सह कलम २६ (२) (आय) २६ (२) (४)२७ (३) (३) ३० (२) (५) ५९ अन्न सुरक्षा अधि २००६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमित पांडे, पोहवा ललीत उईके, पोना प्रणव बनाफर, कार्तिक पुरी, बालाजी बारगुले, शुभम मोरोकार विशेष पहक नागपूर ग्रामीण पांनी पार पाडली.