कामठी तालुक्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 7 :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या कोराडी पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही महिन्यांपूर्वी एका तरुणीचा खून केल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच कोराडी च्या एका नामवंत शाळेतील 10 व्या वर्गाच्या अल्पवयीन शालेय विद्यर्थिनीवर स्कुल व्हॅन चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.मागील काही घटनांचा विचार केला असता.

हैद्राबाद येथील डॉ प्रियंका रेड्डी हत्याकांड घडल्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तर नागपूर च्या अभियांत्रिकी विद्यार्थिनींवर एसिड फेकून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती तसेच हिंगणघाट येथील जळीत कांडाने सर्वत्र हादरल्याचा प्रकार घडला होता. देशात दररोज कित्येक महिलावर मानसिक शारीरिक अत्याचार होत असतात ,सध्या देशात महिला अत्याचाऱ्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत . अशातच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अग्रस्थानी येतो. शासनाने महिला सुरक्षे संबंधी अनेक कायदे अमलात आणले असले तरी अत्याचाराचे प्रमाण कमी न होता वाढतच आहे .कामठी शहरात घडलेले नेहा चव्हाण हत्याकांड अजूनही कामठी वासी विसरले नाहीत त्यातच काही दिवसांपूर्वी कामठी शहरातील रणाळा मार्गावर एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन नराधमाणि बळजबरीने लैंगिक अत्याचार करून मारझोड सुद्धा केल्याची घटना घडली होती यावरून कामठी तालुका सुद्धा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वातावरणाला अपवाद नसल्याने येथील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

देशात, राज्यात, जिल्ह्यात महिलावरील अत्याचाराच्या घटनापासून आपण सर्व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सर्वश्रुत होत असतो .कामठी तालुक्याचा विचार केला असता मागील काही वर्षात अल्पवयीन मुलीची पळवणूक, लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार करणे, विनयभंग , बलात्कार यासारख्या घटना घडल्या आहेत. अविवेक बुद्धीतून महिलांवर अत्याचार करण्यासह अंगावर ऍसिड फेकणे, खून करणे,पेट्रोल टाकून जीवन्त जाळणे, यासारख्या माणुसकीला काळिमा फासण्याच्या घटना समाजाची चिंता वाढविणाऱ्या आहेत. कामठी तालुक्यात काही महिन्यामध्ये मुलींना पळवून नेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे यामध्ये अनेक अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. शालेय तसेच महाविद्यालयिन विद्यार्थ्यानिना शाळा,महाविद्यालयात जाता व येता कामठी बस स्टँड चौक आदी वर्दळीच्या चौकात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भरधाव वेगाने ट्रिपल सीट दुचाकी चालवून कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, कट मारणे, शेरेबाजी करणे आदी प्रकार वाढले आहेत .अनेक मुली मात्र बदनामीच्या भीतीपोटी याबाबत शाळा महाविद्यालयात किंवा घरी पालकांना काहीही सांगत नाहीत त्यामुळे छेड काढणाऱ्यांची हिम्मत वाढत आहे .महिला अत्याचाराचे प्रकार रोखण्यासाठी योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे .एकंदरीतच तालुक्यातील महिला सुरक्षा प्रश्नावर गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन योग्य कारवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जनजागृती अभावी नागरिक अजूनही अनभिज्ञ , प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष 

– महिलावरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभर पोलिसांच्या माध्यमातून डायल 1091 या हेल्पलाईन क्रमांकाची निर्मिती केली तर नागपूर जिलह्यात भरोसा सेल या मदत केंद्राच्या माध्यमातून 24 तास डायल 1091 हे टोल फ्री क्रमांकाची मोफत मदत सेवा दिली जाते.ज्याप्रमाने डायल 100 हा क्रमांक सर्व नागरिकांना सर्वश्रुत असून हा क्रमांक पोलिसांनाच लागतो हा विश्वास देशातील सर्व नागरिकांना आहे मात्र देशातील महिलांनी स्वतंत्र असे हक्काचे पोलिस खात्यात मदत केंद्र असावे या मुख्य उद्देशाने केंद्र शासनाने वुमेन्स हेल्पलाईन नंबर 1091 आणि 1090 ची निर्मिती केली हे दोन्ही क्रमांक संपूर्ण देशभरासठी लागू करण्यात आले आहे दरम्यान या दोन्ही क्रमांकापैकी महिला दोन्ही क्रमांकाचा वापर आपल्या तक्रारीकरिता वापर करु शकतात नागपूर जिल्ह्यासाठी वरील वुमेन्स हेल्पलाईन नंबर 1091 वापर करण्यात येत आहे मात्र या हेल्पलाईन क्रमांकाविषयी कित्येक महिलांना कल्पनाच नसल्याचे दिसून येते .डायल 100 हा हेल्पलाईन क्रमांक सर्वांच्या सर्व तक्रारी तथा मदतीसाठी असला तरी महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक 1091 असूनही 100 क्रमांकाचा वापर करीत आहेत दरम्यान येथील पोलीस विभागाने वुमेन्स हेल्पलाईन नंबर 1091 ता क्रमांकाचा महिलांनी योग्यरीत्या वापर करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे .आज बसस्थानक, शाळा,महाविद्यालये, रेल्वेस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी महिला वर्ग पाहिजे तेवढ्या प्रमाणात स्वतःला सुरक्षित समजत नाहीत किंबहुना सुरक्षित नाहीत महिलावरील अत्याचाराला वेळीच आळा घालता यावा यासाठी डायल 1091 हा वूमेन्स हेल्पलाईन नंबर महिलांच्या तोंडपाठ असने गरजेचे असून याविषयी शाळा , महाविद्यालयाच्या माध्यमातून यांची ओळख होणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे

निर्भया आणि दिल्लीत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती न व्हावी यासाठी अडचणीत सापडलेल्या प्रवाशी महिला व मुलींना पोलिसांची तात्काळ मदत मिळावि या हेतूने ऑटो सुरक्षा च्या माध्यमातून कोशीष या मोबाईल अप्लिकेशन उपक्रमाचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन कामठी पोलिस स्टेशन च्याप्रांगणात हिरवि झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आले होते याप्रसंगी नागपूर जिल्हा ग्रा चे माजी पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह, माजी डीवायएसपी रमेश कंतेवार, माजी पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर प्रामुख्याने उपस्थित होते तर कोशीष या संगणकीय प्रणालीचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक औटो ला विशिष्ट उपकरण लावण्यात आले होते या उपकरणाचा फायदा प्रवाशी व महिला व मुलींना ऑटो मध्ये कधी सामान विसरल्यास ऑटो चालकाने कधी लूटमार करण्याचा किंवा बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येक प्रत्येक ऑटोमध्ये कोशीश उपक्रमा अंतर्गत लावनयात आलेले माहिती फलक ची फोटो स्कॅन करून मदतीसाठी तक्रार किंवा माहिती या कोशिश अप्लिकेशन वर क्लिक करून मदत मिळविता येईल मात्र ही सेवा सुदधा थंडबसत्यात आहे .

– महिला दक्षता सभेचा पडला विसर

शहरातील महिला सुरक्षा तसेच समाजातील घडामोडी संदर्भात नागरिक व पोलीस यांच्यातील वैचारिक आदान प्रदान होत कायदा व सुव्यवस्थेच्या नियंत्रणा संदर्भात योग्य तो दुवा म्हणून पोलीस स्टेशन ला महिला दक्षता सभा ची स्थापना केली आहे मात्र या महिला दक्षता चे सभा कायम घेण्यात संबंधित विभाग इच्छुक नसल्याने सभेचे महत्व नसल्याचे गृहीत धरून सभेचे विसर पडल्याचे दिसून येते.

कामठी तालुक्यातील कोराडी येथे नुकतेच एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे, मागील काही दिवसात वर्धा जिल्ह्यातील हींगणघाट येथील प्राध्यापिकेस एका माथेफिरू युवकाने भर रस्त्यात पेट्रोल टाकून पेटवून दिले, औरंगाबाद मध्ये ही असाच प्रकार घडला, त्या पाठोपाठ लातुरात ही अशीच घटना घडली .मोबाईलवर अश्लील चित्रफीत काढून समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देण्याचे प्रकार ही वाढले आहेत या घटना मुळे तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील महिला भयभीत झाल्याने पालकातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

9 नोव्हेंबर पासून मतदार नोंदणी 

Mon Nov 7 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी कामठी :- आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अहर्ता दिनांक असायचा.म्हणजे 1 जानेवारी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र 2023 पासून जानेवारी, एप्रिल ,जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील त्यांना 9 नोव्हेंबर ते 8 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com