अवैध्य गोवंश वाहतूक करणाऱ्या आरोपीतांना केली अटक

खापा:-  पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन खापा पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून जवाहर टि पॉईंट खापा येथे नाकाबंदी केली असता पारशिवणीचे दिशेकडून खापा वस्तीकडे एक महिंद्रा बोलेरो मिनीमालवाहू वाहन क्रमांक MH40 CM 5206 हे येतांना दिसुन आल्याने सदर वाहनास स्टाफचे मदतीने रोडचे कडेला थांबवून वाहनाचे डाल्याची तपासणी केली असता वाहनाचे डाल्यामध्ये ०९ काळया रंगाचे लहान हले होते (गोवंश) कत्तलीकरीता आखुड दोराने त्यांचे पायांना बांधून अत्यंत क्रुर व निर्दयतेने वाहनाचे डाल्यात कोंबुन त्याची चारापाण्याची कुठलीही व्यवस्था न केलेल्या स्थितीत दिसून आले. पोलीस स्टाफ यांनी सदर वाहनातील वाहन चालकास नाव विचारले असता त्याने परमाल सुखपाल सनिया वय २४ वर्षे रा. बिछुआ ता. बिछुआ जि. छिंदवाडा असे नाव सांगीतले. वाहन चालकास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरची जनावरे कत्तलीकरीता वाहनाचा मालक नामे सलमान असलम कुरेशी वय ३२ वर्षे, रा. बिछुआ ता. विलुआ, जि. छिंदवाडा याचे सांगण्यावरुन वाहतुक करीत असल्याचे सांगीतले. आरोपीकडून ०९ लहान हले (गोवंश) किंमती ५४,०००/-रू. व गोवंश वाहतुकीचे वापरात आणलेली महिंद्रा बोलेरो मिनीमालवाहू वाहन क्रमांक MH40 CM 5206 किमती ५,००,०००/-रू. असा एकुण ५,५४,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीताविरूद्ध पोस्टे खापा येथे कलम ११(१) (ड) (च) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० सहकलम ५ (अ) (१) ५(व), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सहकलम १०९ भा.द.वी सहकलम १३०/१७७ मो.वा.का. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलींद गेडाम, सफौ प्रमोद बन्सोड, पोहवा विनोद पाटील, पंकज ठाकुर, पोशि पन्नालाल यांनी पार पाडली. पुढील तपास सफौ प्रमोद बन्सोड हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण पोलीसांची व्हिडीओ गेमींग पार्लरवर धडक कारवाई एकूण ७९,४००/- रू. चा माल जप्त

Mon Feb 12 , 2024
नागपूर :- गुप्त बातमिदाराकडुन खबर मिळाली की, मौजा टेंभरी येथील महाकाल ट्रेडर्स बिल्डिंग मटेरीयल येथील दुकानाचे बाजुला असलेल्या एका शटर दुकानामध्ये हनुमंत सोनोने हा व्हिडीओ गेम पार्लर मधील इलेक्ट्रॉनीक मशिनवर त्याचे फिरत्या आकड्याचे आधारे तेथे येणान्या ग्राहकांकडून नगदी पैसे रक्कम स्विकारून त्या मोबदल्यात त्यांना तेवढ्या रकमेची चाबी भरून देवुन स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता पैज लावून हारजितना जुगार खेळीत आहे. अशा मिळालेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com