भिवापूर :- पो. स्टे, भिवापूर हद्दीत स्टाफसह अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना भिसी ते उमरेड रोडवर १२ चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-40/CT-1688 व १० चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-36/AA-3751 हे येतांना दिसले त्यांचा पाठलाग करून उकळी फाट्याजवळ त्यांना थांबवून पाहणी केली असता टिप्पर ट्रक क्र. MH-40/CT-1688 चा चालक आरोपी चालक नामे १) जिवन वावन येमणसुरे वय २५ वर्ष रा. चिमणाझरी ता. उमरेड जि. नागपुर याने आपल्या वाहनात मध्ये अंदाजे ०८ ब्रास रेती व टिप्पर एक क्र. MH-36/AA-3751 चा चालक आरोपी नामे २) कुणाल बालु शहारे वय २२ वर्ष रा. निष्ठी ता. पवनी जि. भंडाराया याने आपल्या वाहनामध्ये अंदाजे ०६ ब्रास रेती मिळून आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती हो चोरीची असल्याची खात्री झाल्याने टिप्पर ट्रक क्र. MH-40/CT-1688 किमती ३०,००,०००/- व त्यामध्ये ०८ ब्रास रेती किंमती ४०,०००/- व टिप्पर ट्रक क्र. MH-36/AA-3751 कि. रु. २५,००,०००/- व त्यामध्ये ०६ ग्रास रेती किं. रु. ३०,०००/- असा एकूण रु. ५५,७०,०००/- चा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपी चालक नामे -१) जिवन बावन येमणसुरे वय २५ वर्ग रा. चिमणाझरी ता.उमरेड जि. नागपुर (टिप्पर क्र MH 40 CT 1688 चा चालक) २) कुणाल वालु शहारे वय २२ वर्ष रा. निष्ठी ता. पवनी जि. भंडारा (टिप्पर क्र. MH 36 AA 3751 चा चालक) ३) गंगाधर किसन भोयर रा. सालईमेडा (टिप्पर क्र MH 40 CT 1688 चा मालक) ४) जावेद शेख रा. उमरेड (टिप्पर क्र. MH 36 AA 3751 चा मालक) यांचे विरुद्ध कलम ३७९, १०९ भा. द. वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महा, ज. म. स. सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे अची. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि, १९८४ अन्वये पो. स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपी चालक यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रा. रमेश धुमाळ, उपविभागीय पो. अधिकारी उमरेड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहायक पोलीस निरीश्वक प्रमोद बौधरी, पी.एस.आय. सदमेक, परी. पो. उपनिरीक्षक किरण महागावे, स. फौ. अशोकसिंग ठाकूर, पोलीस अंमलदार रवी वानखडे, सूरज हिवरकर, चा. पो. शि. सोरते यांनी केली.