– पोलीस स्टेशन मौदा ची कार्यवाही
मौदा :-पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ मौदा परिसरात रेडकामी फिरत असतांना मुखविरद्वारे खबर मिळाल्याने भंडारा ते नागपूर रोडने रामचंद्र शाहू वय २८ वर्ष रा. माघनी ता. मौदा हा ट्रक मालक विनापरवाना आपले ट्रकद्वारे रेतीची चोरटी वाहतूक करणार आहे. अशी माहिती मिळाली असता शिंगोरी फाट्यावर मौदा पोलीसांनी रोडवर नाकाबंदी केली असता समोरून ट्रक क्र. एम एच ४० वी जी- ४७०९ रेतीने भरून समोरून येत असल्याचे दिसल्याने व त्यावर संशय आल्याने त्यांना थांबवून चालकाला नाव विचारले असता त्याने आपले नाव १) पिंटू विलासराव देवगडे, वय २५ वर्ष रा. वार्ड नं. २ मौदा २) गोवर्धन विलासराव देवगडे वय २७ वर्ष रा. वार्ड २ मौदा असे नाव सांगितले पंचासमक्ष ट्रकची पाहणी केली असता सदर पिवळ्या रंगाचा ट्रक मध्ये पुर्णपणे रेती भरलेली दिसली. सदर ट्रक हा एम एस ४० वी जी ४७०९ हा रामचंद्र शाहू वय २८ वर्ष रामायनी यांचे सांगण्यावरून मोहगाव देवी ता मोहाडी जि. भंडारा येथून रेती विनापरवाना घेवून येत होता. घटना स्थळावरून १) ६ ब्रास रेती विनापरवाना किंमती ३६,०००/-रु. २) ट्रक क्र. एम एच ४० बी जी ४७०९ किंमती २०,००,०००/- रु. ३) विवो कंपनीचा वि २५ निळसर रंगाचा मोबाईल किंमती १२,०००/- रु. असा एकुण २०,४८,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोशि निखील उदयशंकर मिश्रा यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीताविरुध्द कलम ३७९ ३४ १०९ भादवि सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपी क्र. १) व २) यांना अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उरकुडे हे करीत आहे.