अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- गुन्हेशाखा सोनसाखळी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, पांढराबोडी, संजय नगर रोड येथुन मोठया प्रमाणात अवैधरित्या दारू नेणार आहे अशा माहितीवरून सापळा रचुन संजय नगर रोड, सार्वजनीक रोडवर, ऑटो क. एम.एच ३१ एफ.वी २१६१ ला थांबवून रेड कारवाई केली. आरोपी सुरज अरूण बांबोळे वय ३१ वर्ष रा. एकता सारीपुत्र बुध्द विहार जवळ, पांढराबोडी, अंबाझरी, नागपूर याचे ताब्यात ओसी ब्लू १८० एम.एलच्या ९० बॉटल, रॉयल स्टॅग १८० एम. एलच्या ९६ बॉटल व रोख ५१०/- रू. मिळुन आल्याने सर्व मुद्देमाल व ऑटो असा एकुण २,१३,१५०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द पोलीस ठाणे अंबाझरी येथे कलम ६५(ई) म.दा. का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीस मुद्देमालसह पुढील कारवाईस्तव अंबाझरी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त, नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. संजय धोनार, पोउपनि, अनिल इंगोले, प्रफुल मानकर, संतोष गुप्ता, मनिष बुरडे, संदीप भोकरे, पोअं. कुणाल लांडगे व संदीप पडोळे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी-मौद्याच्या विकासासाठी बावनकुळेंना मिळाला जन-आशीर्वाद

Sun Nov 17 , 2024
– महादुला-कोराडी येथे बाईक रॅलीत नागरिकांचा उत्साह कामठी:- कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचा विकासााचा आराखडा समोर ठेवून सातत्याने धोरणात्मक कामे केली आहे. शांतता, सौहार्द, विकसित हा कामठी – मौदा विधानसभा मतदार संघाचा अजेंडा आहे. त्याला पुढे नेण्याचे काम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुती उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. कोराडी-महादुला येथे काढण्यात आलेल्या जन-आशीर्वाद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!