नागपूर :- फिर्यादी कुवरलाल रामचंद्र मेढे, वय ४५ वर्षे, रा. वाघदरा, प्लॉट नं. २. एम.आय.डी.सी., नागपूर यांनी त्यांची होन्डा सिडी मोटारसायकल क. एम. एच. ४० ए.व्ही ९०३९ ही वानाडोंगरी तेजस्वनी शाळेमागील, बाभळे ले-आउट, येथील बांधकाम साईटवर पार्क करून लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोटारसायकल किंमती २५,०००/-रू, ची चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे अज्ञात आरोपींविरूध्द कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी किरण चुन्नीलाल बिसेन वय ३१ वर्षे, रा. गाव एकोळी, जि. गोंदीया, ह.मु.. वानाडोंगरी, बाबळे ये परी किरायाने, एम.आय.डी.सी., नागपुर यास गोंदीया येचुन ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीने वरील गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे एम.आय. डी.सी. हद्दीतुन होन्डा शाईन क. एम.एव ३१ डी.एन ५५२४ ही सुध्दा चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन दोन मोटरसायकली, किंमती ४५,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील कामगिरी लोहीत मतानी, पोलीस उप आयुक्त (परि. क. ०१), सतिषकुमार गुरव, सहा. पोलीस आयुक्त (एम.आय.डी. सी. विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, महेश चव्हाण, पोनि सपना निरंजने, सपोनि, संजय बंसोड, पोहवा, ओमप्रकाश भारतीय, नापोअं, आशिष पौनीकर, पोअं, धमेन्द्र यादव, वशिष्ठ इंगळे यांनी केली.