भंडारा :- शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा येथील शिल्पनिदेश्क संजयसिंग माहोरे यांचा राज्यपाल महोदयांच्या हस्ते मानपत्र,स्मृतीचिन्ह व अकरा हजार रूपयाचा धनादेश त्यांचा काल सन्मान केला.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, कौशल्य विकास विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा , राज्य कौशल्य विदयापीठ कुलगुरू अपुर्वा पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
विदयापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार स्व.दत्ताली डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य कौशल्य विकास विदयापीठातर्फे कौशल्य ,शिक्षण,प्रशिक्षण, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या स्व.दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान करण्यात येतो. कौशल्य प्रशिक्षणात उत्तम कार्याबददल माहोरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.