हिंगणा तहसीलदारानी मागितले ७ दिवसात उत्तर ; लोकांनच्या प्रश्नांचा तहसील कार्यालयात ७ दिवसांतच करतात का काम किवा देतात का उत्तर?
पुरातत्व विभाग NOC नसतानाही तहसीलदारानी का केले तडकाफडकी शासनाच्या विरोधात आदेश..
नागपूर – हिंगणा तहसील कार्यालयांतर्गत मौजा.वागदरा येथे एक विचित्र प्रकार उघडकीस आले आहे प्राप्त माहितीनुसार हिंगणा तहसील कार्यालयांतर्गत मौजा.वागदरा ग्रामपंचायत इसासनी परिसरात काही ठिकाणी पुरातत्व विभागाच्या अधिकारी नामे वाहणे यांनी संदर्भ पत्र क्र. कावि १३६२/२०२२ दि.१९/०८/२०२२ रोजी अकृषक जिल्हाधिकारी नागपूर यांना दिनांक २२/०९/२०२२ रोजी पत्राद्वारे कळविले होते कि मौजे वागदरा ग्रामपंचायत इसासानी ता. हिंगणा जि.नागपूर चे गट क्र. गट ५७, ५८, ६२, ६३ आणि गट ७५ व ७५ मध्ये महापाषाण शिळावर्तुळ स्थळ असुन ती राज्य संरक्षित घोषित करण्याचा या विभागाचा मानस आहे. त्यामुळे माहापषाणयुगीन शिळावर्तुळ असलेल्या कोणत्याही परिसरात खोदकाम करण्यात येऊ नये तथा कोणत्याही इमारत बांधकामास अथवा भूखंड अधिनियम (Plot layout) परवानगी देण्यात येऊ नये त्याच बरोबर मौजा ईसासनी येथे गट नंबर ५७, ५८, ६२, ६३ आणि गट नंबर ७५ अ ७५ ब येथे कोणत्या ही बांधकामाच्या प्रस्तावास या विभागाची ना हरकत प्रमाण पत्र घेतल्या शिवाय परवानगी देण्यात येऊ नये असे पत्रच्या मार्फत काळविण्यात आले होते. सुत्रा कडून मिळलेल्या माहिती प्रमाणे हिंगणा तहसील कार्यालयांतर्गत मौजा. वागदरा ग्रामपंचायत इसासनी परिसरात यातीलच विवादास्पद Layout ला निवासी अकृषक करण्यात आले होते तसेच गट नंबर ५७, ५८, ६२, ६३ आणि गट नंबर ७५ अ ७५ ब येथील काही भागात महापाषाण शिळावर्तुळ स्थळ असुन त्यांच्या प्रमाणे पुरातनकालीन अवशिष्ट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्याच बरोबरच यातील विवादास्पद Layout ला स्थानिक ग्रामपंचायत विरोध होता तरीही जिल्हाधिकारी व हिंगणा तहसीलदार द्वारे त्यांना निवासी अकृषक का करण्यात आले अशी चर्चा चोफारी होत आहे भूखंडला निवासी अकृषक कसे करण्यात आले असा आम नागरिकांना पडला आहे व सदर भूखंडला पुरातत्व विभागची नकार असतांना ही त्या भूखंड ला NATP व Layout ची परवानगी का देण्यात आली याची SIT आणि लाचलुपत प्रतिबंधक विभाग यांच्या द्वारे सखोलपणे चौकशीसाठी लवकरच एक शिष्ट मंडळ राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहे..