कोदामेंढी :- नागपूर जिल्हा पणन अधिकारी व जिल्हा धान खरेदी समन्वय समिती ने किसान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मौदा तालुक्यातील दहा ठिकाणी धान खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे,असे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले .यामध्ये कल्पना सहकारी भात गिरणी मर्यादित महादूला ,रेवराल ,चाचेर , निमखेडा ,खात .तालुका सहकारी खरेदी विक्री संस्था मर्यादित मौदा, जय किसान बेरोजगार सहकारी संस्था धानोली, सोहम सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था इजनी, खरडा ,आदर्श सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था निहारवाणी या केंद्रावर धान खरेदी होईल. तरी संबंधित केंद्रांतर्गत येणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रात जाऊन नोंदणी करून त्यांचे धान विकण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
मौदा तालुक्यात दहा धान खरेदी केंद्रांना मंजुरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com