संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्ह्यात यंदा गाव असो की शहर नदीच्या पात्रात विसर्जन करता येणार नाही.जिल्ह्यातील कोणत्याही नदी किंवा जलस्रोतात गणेश विसर्जन करू नये .प्रत्येक नगरपरिषद,नगरपंचायत ,ग्रामपंचायतीच्या ठिकाणी कृत्रिम ट्रॅकची व्यवस्था करण्यात येईल त्यातच गणेश विसर्जन करावे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले होते. या आदेशानुसार कामठी शहरातील श्री गणेश मूर्ती विसर्जन महादेव घाटावर होणार नसल्याची वार्ता पसरताच भक्तगणात प्रशासन विरोधात नाराजगीचा सूर वाहत होता.यावर श्री गणेश विसर्जन महादेव घाटावर होण्याच्या पुरातन परंपरेला ब्रेक लागणार असल्याची जाणीव करून देत ही पुरातन परंपरा कायम ठेवत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गणेश विसर्जन महादेव घाटावरच करू द्यावे अशी विनंती निवेदन विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे सादर करण्यात आले.
यावर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारीशी समनव्य साधून गणेश विसर्जन परंपरा कायम ठेवू द्या यावर संवाद साधला यावर जिल्हाधिकारी ने मंजुरी दिली त्यानुसार दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गणेश विसर्जन महादेव घाटावर होणार असल्याचे सांगण्यात आले यावर श्री गणेश भक्तातर्फे आमदार चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी चे आभार मानण्यात आले.
निवेदन देताना ज्येष्ठ समाजसेवक अजय अग्रवाल, राजेश खंडेलवाल,कमल यादव, राजेश देशमुख,मंगेश यादव, समीर यादव,अमोल मेहरे आदी उपस्थित होते.