नागपूरचे विकास पुरुष ओळखले जाणारे, पालनहार केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनाच निवडून द्या, जनतेला आवाहन – सिध्दु कोमजवार

नागपूर :- आगामी लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी नागपूरचे नितीन गडकरींच्या बद्दल एकमताने निर्णय घ्यावा. नागपूर शहरातील महाराष्ट्र लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा नागपूरचे पालनहार, कार्यसम्राट, विकासपुरुष आणि मोदी सरकारमधील सर्वात लोकप्रिय मंत्री नितीन गडकरी यांची लोकप्रियता पुर्ण देशाला लाभली आहे. नितीन गडकरी म्हणून ओळखले जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून दोन वेळा निवडून आले यावर्षीही तिसऱ्यांदा तिकीट मिळाले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव नव्हते, त्यामुळेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना मशाल) सुप्रिया सुळे (शरद पवार राष्ट्रवादी) आणि इतर अनेक विरोधी पक्षांनी गडकरींना आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. त्यांना निवडणूक लढवण्याचे आमंत्रण देऊन त्यांनी स्वतः गडकरींना नागपूर शहर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा मार्ग मोकळा केला आहे आणि तरीही गडकरी हे केवळ सत्ताधारी पक्षातच लोकप्रिय नाहीत तर संपूर्ण विरोधी पक्षातही लोकप्रिय आहेत आणि लोकांव्यतिरिक्त, ते उद्योगपतींमध्ये देखील लोकप्रिय आहेत.मोठ्या व्यासपीठावरून अनेक वेळा सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्यांनी देखील गडकरी आणि त्यांच्या विकासकामांचे कौतुक करत क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आता प्रश्न असा पडतो की, काँग्रेस पक्ष आणि त्यांचे विरोधी व्यासपीठ I.N.D.I.A. आता कोणत्या तोंडाने गडकरीच्या विरोधात आपला उमेदवार उभा करणार आणि भाजपने निवडणूक प्रचारही केला नसतांना त्यांच्यासमोर कोणी बळीचा बकरा का बनणार ? विरोधकांनी गडकरींचे गुणगान करणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स दाखवल्या तरी गडकरी बहुमताने विजयी होतीलच हे निश्चितच ! म्हणून मी सिद्धू कोमजवार राष्ट्रीय धर्माचं पालन करून विरोधी पक्षातील सर्व प्रतिष्ठित मोठ मोठ्या व छोट्या नेत्यांना आवाहन करतो की, गडकरीच्या विरोधात कोणताही उमेदवार उभा करू नये आणि त्यांना बिनविरोध निवडून आणण्यात आपली महत्त्वाची भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करावा.

असे आवाहन शिवसेनेचे नागपूर शहर अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे माथाडी कामगार सेनेचे सिद्धू कोमजवार यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘चारसो पार’मध्ये चंद्रपूरचाही समावेश राहणार - ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

Tue Mar 19 , 2024
– उपराजधानीत “सुधीर आप आगे बढो हम तुम्हारे साथ है ” गजरात दुमदुमला विमानतळ परिसर – नागपूर, खांबाडा, वरोरा, टेंभुर्डा येथे जल्लोषात भव्य स्वागत ; भद्रावती येथे जेसीबीतून फुलांची उधळण चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत सोबत आहे. आज कार्यकर्त्यांचा उत्साह बघून, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या ‘अब की बार चारसो पार’मध्ये आपल्या मतदारसंघाचाही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com