पीएम गतिशक्ति योजनेतर्गत नाशिकमधील मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कसह सहा पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन

नवी दिल्ली :- पीएम गतिशक्ति योजनेच्या अंतर्गत नेटवर्क योजना गटाच्या (NPG) 77 व्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिकयेथील प्रस्तावित मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कासह सहा महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमध्ये गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, आणि अंडमान आणि निकोबार द्वीपसमूहातील विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील परिवहन क्षमतेत अधिक सुधारणा होईल,आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळू शकेल.

पीएम गतिशक्ति योजनेअंतर्गत उद्योग आणि आंतरिक व्यापार संवर्धन विभाग (DPIIT)चे अपर सचिव राजीव सिंह ठाकुर यांच्या अध्यक्षतेखालील नेटवर्क योजना गटाच्या 77 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिकमध्ये प्रस्तावित मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कासह सहा महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत रेल्वे, रस्ते, नागरी विमान वाहतूक आणि बंदरे यांसारख्या विभागांचे प्रकल्प समाविष्ट होते.

नाशिकमध्ये 109.97 एकरांमध्ये विकसित होणारा मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून मालवाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि स्थानिक उद्योगांना मदत मिळू शकेल. तसेच, या प्रकल्पामुळे 2029 पर्यंत दरवर्षी 3.11 दशलक्ष मेट्रिक टन मालाची हाताळणी होईल असा अंदाज आहे.

या व्यतिरिक्त, या बैठकीत गुजरातमधील हजीरा-गोथांगम रेल्वे मार्ग, आसाममधील बिलासीपारा-गुवाहाटी मार्गाचा विस्तार, बिहारमधील बिहटा विमानतळावर नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह, पश्चिम बंगालमधील बागडोगरा (सिलीगुढी)विमानतळाचा विस्तार, आणि अंडमान व निकोबार येथील गैलेथिया खाडीत आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदराच्या विकासासह विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

या सर्व प्रकल्पांचे पीएम गतिशक्ति योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मूल्यांकन करण्यात आले, ज्यामुळे विविध साधनांच्या समन्वित विकासासह शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होणार. तसेच, या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला चालना मिळू शकेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयी मंत्री समूहाची त‍िसरी बैठक राजधानीत संपन्न, मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती

Fri Aug 23 , 2024
नवी दिल्ली :- स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्दयांवर, मंत्री समूहाची तिसरी बैठक नॉर्थ ब्लॉक येथे आज बोलविण्यात आली होती. गोवा राज्याचे मुख्यमंत्री, प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली व यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बाल विकास मंत्री, अदिती तटकरे सहभागी झाल्या. या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, सुरेश खन्ना (अर्थमंत्री, उत्तर प्रदेश), हरपाल एस चीमा (अर्थमंत्री, पंजाब), […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com