संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अनुसूचित जाती विभागाचे संघटन मजबूत करून कांग्रेस पक्ष तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर जिल्हा (ग्रा ) कांग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष राहुल घरडे यांनी माजी नगरसेविका मंदा मिलिंद चिमनकर यांचे सुपुत्र प्रवेशकुमार चिमनकर यांची कांग्रेस अनुसूचित जाती विभाग कामठी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल नवनियुक्त शहर अध्यक्ष प्रवेश कुमार चिमनकर यांनी माजी राज्यमंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, यूथ कांग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश चे कुणाल राऊत, महासचीव युवा कांग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे अनुराग भोयर यांचे मनपूर्वक आभार मानले तर नियुक्तीबद्दल प्रवेश कुमार चिमनकर यांच्यावर कांग्रेस पार्टी चे अल्पसंख्याक कामठी शहर अध्यक्ष मो हुजैफ कुरेशी , वाली कुरेशी , मोहित चिमणकर , रजत चिमणकर , सादमान कुरेशी , कैफ कुरेशी , फरीदा खान आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.