विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

– निवडणुकसंबंधी तक्रारीसाठी संपर्क करण्याचे आवाहन

गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांची विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निरीक्षक (सामान्य) नेमणूक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी विनीत कुमार, 68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी राजेंद्र कुमार कटारा, आणि 69-अहेरी(अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी अनिल कुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

67-आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त विनीत कुमार यांचा संपर्क क्रमांक 9404306018 व 07137-272021 असा असून ते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह आरमोरी येथे सकळी 11 ते दुपारी 1 पर्यंत उपलब्ध राहतील.

68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त राजेंद्र कुमार कटारा यांचा संपर्क क्रमांक 9404306011 असा असून ते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील विश्रामगृहात सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत उपलब्ध राहतील.

69-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त अनिल कुमार ठाकूर यांचा संपर्क क्रमांक 9404306029 असा असून ते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह आलापल्ली येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत उपलब्ध राहतील.

निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांनी निवडणूक निरीक्षक यांच्या मोबाईल क्रमांकावर किंवा विश्रामगृह येथे दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष भेटून तक्रार सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणुक निरीक्षकांकडून व्यवस्थेची पाहणी

Wed Oct 30 , 2024
– स्ट्राँग रुम, कंट्रोल रूम, निवडणूक अधिकारी कार्यालय, मतदान केंद्रांना भेट गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांनी आज उपविभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्राँग रुम, मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तथा इव्हीएम वाटप स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्र, कंट्रोल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com