छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजनेसाठी अर्ज आमंत्रित

नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी मार्फत ‘छत्रती शिवाजी महाराज सारथी’ जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजनेंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थांकडून महाविद्यालयातील मुला मुलींसाठी वसतिगृह चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

संस्था निवडीचे पात्रता निकष अटी शर्ती या सारथी संस्थेच्या http://sarthimaharashtragov.in या संकेतस्थळवर उपलब्ध असून अर्ज 20 डिसेंबर 2023 उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी नागपूर (शहर), विभागीय कार्यालय (सारथी) नागपूर, वनामती, नागपूर परिसर येथील इमारत (शरद व ग्रीष्म) व्ही.आय.पी.रोड धरमपेठ नागपूर येथे पाठवावी.

अर्ज करणारी इच्छुक संस्था ही मुंबई विश्वस्त कायदा, 1950 किंवा संस्था नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. संस्थेचे 3 वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह असलेल्या खाजगी नोंदणीकृत संस्थांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती जिल्हा वसतिगृह नियंत्रण समिती सारथी यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

NewsToday24x7

Next Post

अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले "रक्तदान" 

Wed Nov 29 , 2023
– मनपाच्या ”स्वेच्छा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद Your browser does not support HTML5 video. नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने एचडीएफसी बँक आणि अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित ”स्वेच्छा रक्तदान शिबिरात” आपले सामाजिक कर्तव्य करीत नागपूर महानरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी “रक्तदान” केले. मंगळवार (ता२८) रोजी मंगळवारी झोन कार्यालयात ”स्वेच्छा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com