अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले “रक्तदान” 

– मनपाच्या ”स्वेच्छा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने एचडीएफसी बँक आणि अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित ”स्वेच्छा रक्तदान शिबिरात” आपले सामाजिक कर्तव्य करीत नागपूर महानरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी “रक्तदान” केले.

मंगळवार (ता२८) रोजी मंगळवारी झोन कार्यालयात ”स्वेच्छा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त आचंल गोयल यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, एच.डी.एफ.सी. बँकेचे डिप्टी वाइस प्रेसिडेंट पंकज भईया, वरिष्ठ प्रबंधक वैभव चौधरी, प्रबंधक माहुल शिर्के, अर्पण ब्लड बँकचे व्यवस्थापक सत्यम सिंग, मंगळवारी झोनचे प्रभारी सहायक अधीक्षक अजय परसतवार, प्रभारी झोनल अधिकारी भूषण गजभिये, मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक खान यांच्यासह कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी स्वतः रक्तदान करीत अतिरिक्त आयुक्त आचंल गोयल यांनी ‘रक्तदान श्रेष्ठदान’ असल्याचा संदेश देत आपल्या रक्तदानाने कुणाचा तरी जीव वाचू शकतो त्यामुळे नागरिकांनी देखील रक्तदान करावे असे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणेने कम्प्युटर ऑपरेटर अश्विनी अशोक मेंढे यांनी देखील स्वतःहून रक्तदान केले. तसेच शिबिरात एकूण 26 नागरिकांनी रक्तदान करुन आपला सामाजिक कर्तव्य पार पाडले.

सर्वप्रथम डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी आंचल गोयल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी मंगळवारी झोनचे कर्मचारी यशवंत बक्सरीया, सुधिर पवार, वसंत गोंडाणे, विशाल रमेश दुबे, मिनाक्षी रविंद्र भगत, आदिल रशिद. शेखर निखारे, पंकज लाड, योगेश बोरकर इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

NewsToday24x7

Next Post

कामगार मोर्चा ने साजरा केला संविधान दिवस आणि मन की बात

Wed Nov 29 , 2023
गोंदिया :- येथील प्रभाग क्रमांक सहा, गांधी वार्ड इथे कामगार मोर्चा भाजप गोंदिया जिल्हा व्दारा २६ नोव्हेंबर ला सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा *मन की बात* कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित माजी नगरसेविका भावना कदम, माजी नगरसेविका सुनिता तरोणे, पुर्व विदर्भ कामगार मोर्चा चे अध्यक्ष धनंजय वैद्य, सहकार आघाडी चे अध्यक्ष दिपक कदम, का. मो. जिल्हा सचिव अंकुश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com