“सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प”,मराठा, कुणबी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

Ø अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 ऑगष्ट

नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे च्या वतीने मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता “सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प” 2024-25 योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 15 ऑगष्ट 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

राज्य शासनाच्यावतीने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी लक्षीत गटाच्या विद्यार्थ्यांकरिता सारथी मार्फत वर्ष 2024-25 करिता “सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प” राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणांतर्गत सारथी पुणे विभागीय कार्यालयामार्फत 12वी उत्तीर्ण 20 विद्यार्थ्यांना सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील मोडीलिपी प्रशिक्षण संस्थेद्वारे 60 तास (2 महिने) ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्रामार्फत कुठल्याही शाखेतील पदवीधर 50 विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापतीठातील छत्रपती शाहु महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राद्वारे 6 महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील मोडीलिपी प्रशिक्षण संस्थेद्वारे कुठल्याही शाखेतील पदवीधर 40 विद्यार्थ्यांना 1 वर्ष कालावधीसाठी मोडीलिपी सर्टिफिकेट कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पात्रता व विद्यावेतन

पुणे, कोल्हापूर व संभाजीनगर विद्यापीठ व जिल्हा मुख्यालयाच्या बाहेरील कागदपत्रांच्या छाणनीद्वारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना प्रति विद्यार्थी दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. उमेदवारांस पूर्वलक्षी प्रभावाने आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.

या मोडीलिपी प्रशिक्षणाबाबतची संपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्वे, ऑनलाईन अर्ज, अर्ज भरण्याकरिता सूचना व हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता आदींबाबत https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर लिंक 15 ऑगष्ट 2024 पर्यंत उपलब्ध राहील. विभागीय कार्यालयास हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम मुदत 20 ऑगष्ट 2024 आहे. या तारखेमध्ये बदल असल्यास सारथीच्या संकेतस्थळावर सूचित करण्यात येणार आहे. जास्तीत-जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

Thu Aug 1 , 2024
नागपूर :- साहित्यरत्न तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social Media x […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!