नागपूर :- छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास संस्था मार्फत लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता २०२४ -२०२५ करीता विविध स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
सारथी या संस्थेकडून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत लक्षित गटातीला विद्यार्थ्यांना महत्वाच्या परीक्षेसाठी प्रशिक्षण, विद्यावेतन व आर्थिक सहाय्य करण्यात येते.
लक्षित गटातील उमेदवारांकडून यूपीएससी, एमपीएससी, एमएससीआयटी, नेट, आयबीपीएस, या महत्वांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तुकडी साठी ऑनलाईन अर्ज www. sarathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ३१ जानेवारी पर्यंत सादर करावेत. जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपव्यवस्थापकी संचालक (सारथी) हरिष भामरे यांनी केले आहे.