बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी १४ आगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई :- सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा” चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

कृषी यांत्रिकीकरण या टायटल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्ज करणेबाबतची कार्यवाही

अर्ज करणे साठी वेबसाईट

“https://mahadbt.maharashtra.gov.in”

लाभार्थी (शेतकरी ) “युजर आयडी व पासवर्ड” टाकणे

“अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे

“कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे

“मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे

“तपशील” बाबीवर क्लिक करून –

“मनुष्यचलित औजारे घटक निवड”

“यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे”

“बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे

जतन करणे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमितील प्रस्तावित पार्किंगचा खड्डा बुजविण्याला प्रारंभ

Wed Aug 7 , 2024
– एनएमआरडीएनी केली दीक्षाभूमीच्या कामाची पाहणी – उघडे लोखंडी रॉडही कापणार – पाहणी करताना स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरेई ससाई, एनएमआरडीएचे अधीक्षक अभियंता संजय चिमुरकर नागपूर :- नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता संजय चिमुरकर यांनी मंगळवार, ६ ऑगस्टला सकाळी दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राऊंड पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. अर्धा तास पाहणीत २० सप्टेंबर पर्यंत खोदकाम केलेली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!