पुणे-सोलापूर, पुणे- सातारा, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत व्यवसाय काढून घेण्याचे आवाहन

पुणे :- पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० तसेच पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अनधिकृत व्यवसाय सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन करतानाच सेवा मार्गावरील दुभाजक तोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिला आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील या तीनही महामार्गाच्या हद्दीमध्ये लगतच्या काही मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे एनएचएआयच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महामार्गाच्या विस्तारीकरण कामास अडथळे येत आहेत.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या हद्दीमध्ये ज्या भागात ३० मी. कायदेशीर हक्काचा मार्ग (राईट ऑफ वे) आहे त्या भागात मध्यापासून १५ मीटर तसेच ज्या भागात ६० मी. राईट ऑफ वे (आरओडब्ल्यू) आहे त्या भागात मध्यापासून ३० मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या हद्दीमध्ये ज्या भागात ३० मी. ‘आरओडब्ल्यू’ आहे त्या भागात मध्यापासून १५ मीटर, ज्या भागात ४५ मी. आरओडब्ल्यू आहे त्या भागात मध्यापासून २२.५ मी. तर ज्या भागात ६० मी. राईट ऑफ वे आहे त्या भागात मध्यापासून ३० मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. तर पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील मध्यापासून ३० मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जे व्यावसायिक महामार्गावरील व सेवा रस्त्यांवरील मार्ग दुभाजक अनधिकृतपणे तोडून येण्या-जाण्याकरीता मार्गिका तयार करतील अशा व्यावसायिकांवर व अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांचा व्यावसाय परवाना जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात येईल. तरी सर्व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी व अनधिकृतपणे मार्ग दुभाजक तोडू नये किंवा महामार्गावर तसेच सेवा रस्त्यांवर अतिक्रमण करु नये, असे आवाहन प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लेझर ड्रोन लाईट शो द्वारे शिवजयंती साजरी

Thu Feb 22 , 2024
नागपूर :- भारतीय जनता युवा मोर्चा, दक्षिण नागपूर द्वारे आमदार मोहन मतेंच्या मार्गदर्शनात सक्करदरा तलाव परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ड्रोन लाईट शो, लेझर मॅपिंग शो तसेच फटका शो चे भव्य आयोजन करण्यात आले. शिवाजी महाराजांवरील लघुकथापट तसेच भारतीय संस्कृतीची संक्षिप्त गाथा अत्यंत सुंदररित्या मोकळ्या आसमनतात अंकीत करण्यात आली, या उत्साहपूर्ण कार्यक्रमात सुमारे ४०००० हून अधिक युवक-युवती तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. आय.आय.टी. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com