चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी तथा कुटुंब निवृत्तीधारकांनी हयातीचा दाखला भारतीय स्टेट बँक, मुख्य शाखा,चंद्रपूर येथून प्रमाणित करून महानगरपालिकेतील लेखा विभागात तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व कुटुंब निवृत्तीधारकांनी त्यांच्या हयातीचा दाखला बँक ऑफ इंडिया, चंद्रपूर येथून प्रमाणित करून महानगरपालिकेतील शिक्षण विभागात दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करावेत.
तसेच सन 2022-23 या वित्तीय वर्षाच्या आयकर परिगणनेसाठी ज्यांना पेन्शन प्रदानाची वार्षिक रक्कम रुपये 2,50,000 पेक्षा अधिक होते अशा सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, कुटुंब निवृत्तीधारक तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आयकरासाठी लागणारे पॅन कार्डची प्रत तसेच गुंतवणूक बचत केली असल्यास त्यांची साक्षांकित कागदपत्रे दि. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत महानगरपालिकेतील पेन्शन लिपिकाकडे/ शिक्षण विभागाकडे सादर करावीत. असे मनपा प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे.