यवतमाळ :- सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनास ही नंबरप्लेट आवश्यक असल्याने बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता पुढीलप्रमाणे सुचना जारी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील एम/एस रोसमेरटा सेफ्टी सिस्टिम एलटिडी ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता https//mhhsrp. com हे बुकींग पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे. वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दि.31 मार्च पुर्वी बसवून घेण्याबाबत यापुर्वी कळवण्यात आले होते. परंतू त्यास मुदतवाढ देण्यात आली असुन 30 जून पुर्वी वाहन मालकांनी त्यांच्या वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवुन घेणे आवश्यक आहे.
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता काही पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अरिहंत अॅग्रो, धामणगांव रोड, यवतमाळ, राधे टॅक्टर्स प्लॉट इंदिरा नगर, पुसद, लकी ऑटो एजन्सीज, महागाव रोड उमरखेड, मे. रुख्मीणी टॅक्टर्स, 0वरोरा रोड, वणी, चिद्दरवार टॅक्टर्स, नागपूर रोड, पुसद, साई टॅक्टर्स, पांढरकवडा रोड यवतमाळ, शिवशंभू टॅक्टर्स, एमआयडीसी लोहाराचा समावेश आहे. या नंबरप्लेटकरीता जीएसटी वगळून दुचाकी, ट्रॅक्टर या वाहनांकरिता ४५० रुपये, तीनचाकी वाहनांकरिता ५०० रुपये व इतर सर्व वाहनांकरिता ७४५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे, असे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.