अतिक्रमण नियमित करण्यासाठी नगर परिषदेत अर्ज करा माजी नगरसेविका संध्या रायबोले यांचे आवाहन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-आनंद नगरात प्रधानमंत्री आवास योजनासाठी शिबिराचे आयोजन

कामठी :-प्रधानमंत्री आवास योजना चा लाभ मिळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज भरावे, असे आवाहन भाजपच्या माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले.

प्रभाग 15 तील आनंद नगर समाज भवन येथे नगर परिषदच्या वतीने अतिक्रमण नियमित करण्यासाठी शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले यावेळी संध्या रायबोले बोलत होत्या.

माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशावरून प्रभाग 15 तील औद्योगिक आरक्षण काढून निवासी आरक्षण लागु करण्यात आले तसेच पहिल्या टप्पयात 20 लाभार्थीना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल बांधुन दिल्याचे माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी सांगितले.

यावेळी कर निरीक्षक प्रदीप भोकरे, माजी नगरसेवक निरज लोणारे,उज्वल रायबोले,विक्की बोंबले, निमिश सांगोडे, अरुण पौनिकर, राकेश मोहबे, सतीश यादव, श्यामराव मैंद, विद्या बोंबले, जया मेश्राम, भारती कनोजे, सिता पटले, अनिता फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते.

आजच्या शिबिरात एकून 65 नागरिकांनी अतिक्रमण नियमित करण्यासाठी अर्ज दाखल केले, रोशन तंवर, सुस्मित भोतमांगे, धनेश जुनघरे,आकाश उपरीकर,यश रंगारी, सादिक शहनवाज यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवमतदारांनो, कर्तव्यांची जाणीव ठेवा; मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा! मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

Sat Jul 15 , 2023
o ‘मिशन युवा’ कार्यक्रमाचे दिमाखदार उदघाटन o जिल्ह्यात किमान 75 हजार नवमतदारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट नागपूर :-  राज्यातील एकूण लोकसंख्येत 18 आणि 19 वर्षे वयोगटातील युवकांचे प्रमाण 5.8 टक्के आहे. मतदार यादीत मात्र हे प्रमाण प्रतिबिंबित होत नसून हे प्रमाण केवळ 0.68 (पॉईंट अडूसष्ट) टक्के आहे. 18 आणि 19 वर्षाच्या युवकांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 15 टक्के आहे. नवमतदारांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com