गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरणास पुन्हा एक महिना संधी – खोपडे

– 05 ऑगष्ट ते 05 सप्टेंबर पर्यंत घेणार ऑनलाईन अर्ज

नागपूर :- आमदार कृष्णा खोपडे यांच्या प्रयत्नाने गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरण करिता पुन्हा एक संधी देण्यात आली असून आता 05 ऑगष्ट ते 05 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज घेण्यात येईल.

आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, नागपूर शहरातील आउटर क्षेत्र आणि पूर्व नागपुरातील मौजा-भांडेवाडी, पुनापूर, वाठोडा, चिखली, कळमना आदी आउटर परिसर मोठ्या प्रमाणात असून अनेक अनधिकृत ले आउट या भागात आहे. अनेक भूखंडधारकांनी गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरण करिता ऑनलाईन अर्ज दाखल केले. तर अनेक नागरिक काही अडचणीमुळे अर्ज भरू शकले नाही. त्या भूखंडधारकांना पुन्हा एक संधी देण्यात यावी, अशी मागणी मी लावून धरली होती. आज ना.सु.प्र. सभापती मनोज सूर्यवंशी यांनी भेट घेतली तेव्हा त्यांनी यास मान्यता दिली व 05 ऑगष्ट ते 05 सप्टेंबर 2023 अशी एक महिन्याची मुदत पुन्हा देण्यात आलेली आहे. कदाचित ही शेवटची संधी असू शकते. त्यामुळे जे काही भूखंडधारक सुटले असतील, त्यांनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावा.

08 ते 11ऑगष्ट पर्यंत भवानी माता मंदिर परिसर, पारडी येथे ‘शासन आपल्या दारी’

08 ते 11 ऑगष्ट पर्यंत पारडी येथील भवानी माता मंदिर परिसरात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आहे. या शिबिरात ना.सु.प्र.चे अधिकारी देखील राहतील. या ठिकाणी सुद्धा गुंठेवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे. जे काही नागरिक आतापर्यंत अर्ज करू शकले नाही किंवा ज्यांना अन्य शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा नागरिकांनी आवर्जून शिबिराला भेट द्यावी व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आव्हान आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

DELHI PUBLIC SCHOOL KAMPTEE ROAD, NAGPUR MORNING ASSEMBLY ON CLASSROOM RULES 2nd august 2023

Thu Aug 3 , 2023
Nagpur :- Rules are necessary to maintain a safe and secure environment for students to learn and teachers to carry out their duties. We must maintain discipline and adhere to a set of rules and regulations in order to maintain a productive environment. Upholding discipline and a conducive learning environment, the students of Grade Preparatory Giraffe at Delhi Public School […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com