नागपूर, दि. १९ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित केली.
सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, समीर कुणावत, सुभाष धोटे, सुनिल भुसारा यांचा यात समावेश आहे.
विधानपरिषद तालिका सभापतींच्या नावांची घोषणा
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, अभिजीत वंजारी यांच्या नावांची घोषणा केली.