मुंबई : विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर सन 2023-24 या वर्षासाठी सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीचे प्रमुख म्हणून विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, गोपिचंद पडळकर, ॲड.अनिल परब, विलास पोतनीस अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, कपिल पाटील हे या समितीचे सदस्य असणार आहेत, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी कळविले आहे.