– स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
नागपूर – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुख्यबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे पारशिवनी हद्दीतून शिवाजी चौक पारशिवनी नागपूर मार्गाने 4 चाकी चॉकलेटी रंगाची महिंद्रा झायलो गाडी क्रमांक एमएच-43/एक्स-3123 चा चालकाने त्याचे गाडी मालकाचे सांगण्यावरून कत्तली करिता गौवंश जनावरे ची अवैध वाहतुक करीत आहे. अश्या माहिती वरून शिवाजी चौक पारशिवनी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारशिवनी पोलिस स्टाफ च्या मदतीने नाकाबंदी केली असता सदर वाहन चालकाने नाकाबंदी च्या ठिकाणी वाहन न थांबविता थोडे समोर थांबवून त्याच्या ताब्यातील गाडी घटनास्थळावर सोडून पळून गेला.
सदर वाहन चालकाचां पाठलाग केला असता वाहन चालक हा मिळून आला नाही. वाहनाची पाहणी केली असता त्यात 6 गायी व 1 गोरा कि. 70,000/-रू. चे जनावरे कु्रर व निदर्यतेने वाहतुक करतांना मिळुन आले. घटनास्थळावरून एकुण 7 जनावरे किमंती 70,000/-रूपयाचे व महिंद्रा झायलो गाडी क्रमांक एमएच-43/एक्स-3123 किमंत 5,00,000/- रूपये असा एकुण कि. 5,70,000/- रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी सरतर्फे सहायक फौजदार चंद्रशेखर गाडेकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. पारशिवनी येथे आरोपीविरुध्द कलम 11(1)(घ)(ड)(च) सहकलम 5,(अ),(9) सहकलम 109 भादवि सहलम 184 मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार संदीप कडू हे करीत आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणिकर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात सहायक फौजदार चंद्रशेखर गाडेकर, पोलीस नाईक मयुर ढकले, अमृत किंनगे, रोहन डाखोरे, अमोल वाघ यांचे पथकाने पार पाडली.