नागपूर :- महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी आनंद वसंतराव कुमरे (वय ४८) यांचे सोमवारी (दि. २७) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या पाच वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यामागे पत्नी व मुलगा आणि मोठा आप्तपरिवार आहे. महावितरणचे जनसंपर्क अधिकारी म्हणून २००८ पासून आनंद कुमरे यांनी भांडूप, कल्याण, अकोला, नागपूर व चंद्रपूर येथे काम केले आहे. त्यापूर्वी पत्रकारिता करीत असताना चंद्रपूर येथे लोकमत टाईम्सचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत होते. महावितरणचे अतिशय प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी असलेले आनंद कुमरे हे चित्रकार, काष्ठ शिल्पकार व मूर्तीकार देखील होते. चंद्रपूर येथे आनंद कुमरे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्काऱ करण्यात आले.