संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावातील एका शेतकऱ्याच्या घरातून शेती कामात उपयोगी येत असलेले बैलजोडीला लागणारे लोखंडी कल्टीवेटर अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची घटना काल दिवसाढवळ्या 5 दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी हेमराज गोरले वय 55 वर्षे रा गादा कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सूरु आहे.