संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर -जबलपूर महामार्ग क्र वरील लिहिगाव मार्गावरील मंगेश ढाब्यासमोर भरधाव वेगाने जात असलेल्या दहा चाकी कंटेनर चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीनचाकी ऑटोचालकाला दिलेल्या धडकेत घडलेल्या गंभीर अपघातात ऑटोचालक गंभीर जख्मि होऊन जागीच मृत्यू पावल्याची घटना गतरात्री 9 वाजता घडली असून मृतक ऑटोचालकाचे नाव नरेशकुमार गुप्ता वय 40 वर्षे रा प्रगती नगर मानेवाडा ,नागपूर असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळी व वेळी आरोपी 10 चाकी कंटेनर क्र यु पी 17 ए टी 2329 च्या चालकाने आपल्या ताब्यातील कँटेनर भरधाव वेगाने निष्कळजीनपणाने चालवून विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीन चाकी ऑटो क्र एम एच 49 ए आर 9871 ला जोरदार धडक दिली.ज्यात ऑटो चालक जागीच मरण पावला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविन्यात आले. पोलिसांनी तुर्तास घटनेची नोंद करीत आरोपी कंटेनर चालक विरुद्ध भादवी कलम 279,304 (अ )अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.