कामठी तालुक्यात शालेय प्रवेशोत्सव साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
-आज 27 जून शाळेचा पहिला दिवस साजरा , विद्यार्थ्यांचे ‘स्कुल चले हम’
कामठी ता प्र 27:-गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते त्या पाश्वरभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी राज्यातील सर्वच शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते त्यानुसार आज 27 जून शाळेचा पहिला दिवस म्हणून कामठी तालुक्यातील प्रत्येक शाळेत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.तर शालेय सुट्ट्यानंतर आज 27 जून पासून शाळेचा पहिला दिवस म्हणून तालुक्यातील समस्त शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला तर विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले.
शाळा सुरू होणार असल्याने बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पालक , विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली होती तर आज 27 जून शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी शाळेत जाण्याच्या उत्साहासह ‘स्कुल चले हम’चा गुंज करीत शाळेत जाण्याच्या उत्साहात दिसून आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गोंदियात अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर हल्लात तोडफोड

Mon Jun 27 , 2022
अमरदिप बडगे गोंदिया – गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपला समर्थन दिल्याने आज गोंदियात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी अग्रवाल यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करित तोडफोड केल्याची घटना घडली असुन यांचा व्हिडिओ समोर आल्याने गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अग्रवाल समर्थकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights