युवा महोत्सव २०२२ मध्ये अमरावती जिल्ह्याचा बोलबाला

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाला सर्व साधारण विजेतेपद

श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या यशस्वी आयोजनाची सर्वत्र प्रशंसा

अमरावती :- चार दिवस चाललेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ्याच्या युवा महोत्सवाची सांगता दिखामदार सोहळ्याने झाली. सातवीस कला प्रकारातील ८१ विजेत्या चमू व कलावंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात सर्वाधिक १२ पारितोषिके प्राप्त करणारे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय,अमरावती सर्व साधारण विजेतेपदाचे मानकरी ठरले. संपूर्ण युवा महोत्सवामध्ये अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सर्वाधिक पुरस्कार प्राप्त केल्यामुळे महोत्सवात अमरावती जिल्ह्याचा बोलबाला राहिला.

या महोत्सवाचा पारितोषिक समारंभ १५ ऑक्टोबरला रात्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पीडीएमसी येथे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. या सोहळ्याला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.गजाननराव पुंडकर, अॅड.भैय्यासाहेब पुसदेकर, कार्यकारिणी सदस्य सुरेशदादा खोटरे, प्रा. सुभाष बनसोड, सचिव डॉ. वि.गो.ठाकरे, प्रकुलगुरू डॉ.विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ.तुषार देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विचारपीठावर मुख्य संयोजक प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.राजीव बोरकर, निवड समितीचे अध्यक्ष डॉ.प्रफुल्ल गवई, समन्वयक डॉ.सुभाष गावंडे, डॉ.जयश्री वैष्णव, डॉ.निखिलेश नलोडे, डॉ.गजानन केतकर, डॉ.रेखा मग्गिरवार, डॉ.नितीन चांगोले, डॉ.राजेश बुरंगे आदी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपल्यातील विविध कला प्रकारांना प्रोत्साहित करण्यासाठी हा महोत्सव एक माध्यम असल्याचे सांगितले व आपल्यातील कलागुणांना अधिक विकसित करून यशोशिखर गाठा,असे आवाहन केले. प्रमुख अतिथी अॅड. गजाननराव पुंडकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था सदैव अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली. प्रकुलगुरू डॉ.विजयकुमार चौबे यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

युवा महोत्सवामध्ये अमरावती जिल्ह्यातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, कॉलेज ओफ अनिमेशन, प्रा.राम मेघे इंजिनिअरिग कॉलेज, फार्मसी कॉलेज बडनेरा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, केशरबाई लाहोटी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, बियाणी महाविद्यालय, पी.आर.पोटे महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय, कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, शिवाजी शिक्षण महाविद्यालय, डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती विद्यापीठ, महात्मा फुले महाविद्यालय, वरुड, आदर्श महाविद्यालय, धामणगाव आदी महाविद्यालयांच्या चमूंनी विविध कला प्रकारात पारितोषिके प्राप्त केली. या महोत्सवामध्ये १७९ महाविद्यालयाच्या सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी विविध भागातून आलेल्या शंभर परीक्षकांनी स्पर्धांचे चांगले परीक्षण केले.

समारोपीय कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.राजीव बोरकर यांनी केले. डॉ.वैशाली देशमुख यांनी कार्यक्रमाचे संचालन तर डॉ.सुभाष गावंडे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला शहरातील गणमान्य व्यक्ती, विद्यापीठाचे अधिकारी, आयोजन समितीचे सर्व सदस्य, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी आणि युवा महोत्सवात सहभागी स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची राज्यपालांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना 

Mon Oct 17 , 2022
मुंबई :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आपला नफा कमीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com