कारच्या धडकेने रूग्णवाहिकेचे नुकसान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- गोंडेगाव वरून नागपुर येथे रूग्ण घेऊन जाताना राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील आंबेडकर चौक कन्हान जवळ कार चालकाने आपले वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालुन रूग्णवाहिकेला मागुन धडक मारल्याने रूग्णवाहिकेचे नुकसान झाले असुन कुठलिही जख्म किंवा जिवहानी झाली नाही.

अब्दुल शईद अब्दुल वहाब कुरेशी वय ४१ वर्य, धंदा वाहन चालक सरताज कॉलोनी बडा ताजबाग नागपुर हा आठ वर्षा पासुन बीव्हीजी महाराष्ट्र लि. मध्ये रूग्णवाहीका चालविण्याचे काम करित असुन त्यांचे कडे रूग्णवाहि का क्र. एम एच १४-सीएल – ०४३० असुन कंपनीच्या कॉल वर चालवितो. रविवार (दि.१२) डिसेंबर ला दुपारी १.५५ वाजता दरम्यान कंपनी ने फोन करून सांगितले की, गोंडेगाव कन्हान येथील रूग्णाला त्वरित दवाखान्यात घेऊन जायचे आहे. त्यामुळे मी व ईएमएसओ चे डॉ. नातीककुर रहीम नीयाज उररहीम सह रूग्णवाहिकेने गोंडेगावला गेलो आणि तेथील रूग्ण व त्यांचे ३ नातेवाईकाना घेऊन डाँगा रूग्णालय नागपुरला जाताना अंदाजे ३. २० वाजता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ने नागपुरला जाताना आंबेडकर चौक कन्हान जवळ आल्यावर मागुन येणा-या वाहनाने जोरदार धडक मारल्याने मी थांबलो. खाली उतरून पाहीले तर चारचारी कार क्र. एमएच – ३१- एफई- ८१६० ने धडक मारून रोडच्या बाजुने उभी होती. माझ्या रूग्णवाहिकेचा मागचा भाग व उजवीकडील दरवाजा आत चिपकुन डँमेज झाल्याने मोठे नुकसान झाल्याने कन्हान पोस्टे ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी कार चालक अक्ष य सिंग अजयसिंग गहलोद वय ३० वर्ष राह. न्यु बीडी पेठ नागपुर यांचे विरूध्द अप क्र.७११/२०२२ कलम २७९ भादंवि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैधरित्या तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीस कन्हान पोलीसांनी केली अटक

Wed Dec 14 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत केमीकल ग्राउंड कन्हान येथे अवैधरित्या लोखंडी तलवार घेऊन फिरणारा आरोपी पियुष रंगारी यास कन्हान पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन तलवार जप्त करून पोस्टे ला त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१२) डिसेंबरला रात्री १० ते १०:३० वाजता दरम्यान पो.ना. शैलेश राजाराम वराडे आपल्या सहकार्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com