पाली विभागात आंबेडकर जयंती साजरी

प्रबोधन हाच जयंतीचा उद्देश असावा : डॉ नीरज बोधी 

नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अलीकडे देशभर धुमधडाक्यात साजरी होत आहे. नवीन पिढीने त्याला आनंद उत्सवाचे स्वरूप देऊन डीजेच्या तालावर नाचणे गाणे व थिरकने सुरू केलेले आहे. खऱ्या अर्थाने महापुरुषांची जयंती ही प्रबोधनाचा दृष्टिकोन पुढे ठेवून समाजात बंधुभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने साजरी केली पाहिजे व त्यासाठी समाजातील सुशिक्षित व प्रबुद्ध वर्गाने पुढाकार घ्यावा असे आवाहन पाली विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी यांनी केले.

आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पाली व बौद्ध अध्ययन विभागात आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी डॉ आंबेडकर विचारधारा विभागाचे विभाग प्रमुख प्रो डॉ शैलेंद्र लेंडे व आंबेडकर अध्यासन चे नवनियुक्त प्रमुख डॉक्टर अविनाश फुलझेले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

तथागत बुद्धाने सर्वप्रथम भारतात लोकशाहीची मूल्य रुजवली अशी माहिती डॉ अविनाश फुलझेले यांनी दिली, तर डॉ आंबेडकर हे व्यक्ती नसून ते मानव मुक्तीचे तत्वज्ञान असल्याची माहिती डॉ शैलेंद्र लेंडे यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ तुळसा डोंगरे यांनी, सूत्रसंचालन निवृत्त न्यायाधीश विजय धांडे, यांनी तर समापन सहारे यांनी केला. याप्रसंगी प्रीती रामटेके, निशा वानखेडे, अलका जारुंडे यांनी प्रबोधनात्मक गीते गायली.

कार्यक्रमात पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील प्रा डॉ ज्वाला डोहाने, डॉ सुजित वनकर, प्रा रोमा शिंगाडे, प्रा सरोज वाणी, विद्यार्थी उत्तम शेवडे, सिद्धार्थ फोपरे, दिलीप गायकवाड, चंदा लाडे आदिनी पाहुण्यांचे स्वागत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोतीराम मोहाडीकर यांना पुन्हा तहसील पोलिसांनी ताब्यात घेतले. चार-पाच तास बसून ठेवलेत? काय हा माणूस गुन्हेगार आहे काय ?

Mon Apr 17 , 2023
नागपूर :- दिनांक-14/4/2023 रोजी सांयकाळी 6 वाजता. मध्य नागपुरातील बांगलादेश, तांडापेठ या परिसरात असलेल्या नाईक तलाव व लेंडी तलाव सौन्दर्यीकरनाच्या उदघाटन सोहळ्याला नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे प्रामुख्याने येणार आहेत. मागील 1 एप्रिल ची घटना लक्षात घेता, हलबा समाजाचा सामाजिक कार्यकर्ता, काँग्रेस चे युवा नेता मोतीराम मोहाडीकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतला.परमपूज्य डॉ. बाबासाहेब आम्बेडकरचा संविधान प्रमाणे हलबा जमातीला शेड्यूल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!